अकलूज येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन

विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली शिवबाबांचा छायाचित्रकारांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन

अकलूज ( बारामती झटका )

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिव-कीर्ती युवा मंच, अकलूज नगरपरिषद व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन भरवले जाणार असल्याची माहिती माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली.

आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, ज्यांनी संघर्ष केला, ज्यांचे या लढ्यात अनमोल योगदान होते, अशा क्रांतिकारकांचा आजच्या पिढीला परिचय व्हावा या उद्देशाने अकलूज येथील नगरपरिषदेच्या सभागृहात दि. 15, 16 व 17 ऑगस्ट असे तीन दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.

या प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वा. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी शिवशंकर बझारच्या चेअरमन स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील आणि आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त चंद्रकांत शहासने, तसेच अकलूज परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन तिन्ही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथे उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर व पै. अक्षय शिंदे पुणे यांच्यात १ लाख ५१ हजार इनामावर लढत होणार.
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here