इंदापूर (बारामती झटका)
कोरोना रोखण्यासाठी योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान चव्हाण मोटर्स, सोलापूर यांनी कृष्णाप्रिया लॉन्स संग्रामनगर, अकलूज या ठिकाणी आयोजित केला होता. कोरोना योद्ध्यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य आणि स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक, सामाजिक संस्थांनी जे योगदान दिले आहे तसेच सेवाभावी वृत्तीने कार्य केले आहे, त्याची दखल घेत चव्हाण मोटर्स, सोलापूर यांनी त्यांच्यासाठी सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी माजीमंत्री हर्षवर्धन पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘कोरोना विषाणू साथीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान हा उपक्रम स्तुत्य असून कोरोना योद्ध्यांचे कार्य, त्यांचे शौर्य, त्यांच्या सेवावृत्तीचा मी मनापासून आदर करतो. ही सेवावृत्ती आपली ताकद असून आपण यावर धैर्याने मात करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, भाजपा सोलापूर जिल्हा संघटक तसेच शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील, वरिष्ठ वैज्ञानिक रतन जाधव आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चव्हाण उद्योग समूहाचे शिवप्रकाश चव्हाण, घनश्याम चव्हाण तसेच दिलीप भाटिया, शिवाजी भोसले, शिवाजी सावंत यांनी प्रयत्न केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
