अकलूज विकास सेवा सोसायटीची व्यवस्थापक समिती निवडणूक बिनविरोध.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह बारा व्यवस्थापक समिती सदस्य बिनविरोध.

अकलूज ( बारामती झटका )

अकलूज विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित अकलूज, ता. माळशिरस या संस्थेशी व्यवस्थापक समिती निवडणूक सन 2021-22 ते 2026-27 साला करिता व्यवस्थापक समिती निवडणूक बिनविरोध झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, लक्ष्मणराव विठोबा आसबे, प्रतापराव माणिकराव देशमुख, लक्ष्मण दशरथ इंगोले, विजयकुमार दादासो सावंत, संभाजीराव नारायणराव देशमुख, रामदास गजाबा गायकवाड, योगेश जगन्नाथ देशमुख, असे आठ सदस्य सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटामधून आहेत. महिला प्रतिनिधी गटात विजयालक्ष्मी नंदकुमार कुरुडकर, वनिता नंदकुमार माने, अनुसूचित जाती जमाती गटात बलभीम तुळशीराम साठे, इतर मागास प्रवर्ग गटात कुंडलिक दत्तात्रय एकतपुरे भटक्या जमाती विभक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात अशोक धोंडीबा नरूटे असे तेरा सदस्य बिनविरोध सहाय्यक निबंधक संस्था कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी डी.पी. राऊत यांनी यादी प्रसिद्ध केली.

अकलूज विविध कार्यकारी सेवा सोसायटी या सोसायटी मधून 12 गावांचा आर्थिक व्यवहार सुरू होता. अकलूज, आनंदनगर, यशवंनगर, माळेवाडी, माळीनगर अशा अनेक गावांचा समावेश होता. कालांतराने अनेक गावांमध्ये सेवा सोसायट्या स्थापन झाल्या. त्यामुळे दिवसेंदिवस सभासदांची संख्या कमी होत गेलेली आहेत. सध्या 625 आसपास सभासद आहेत. तीन कोटीच्या जवळपास वाटप केले जाते. 100% कर्ज वसुली असते सेवा सोसायटी ची स्वतःची जागा व इमारत आहे. कापड दुकान, कृषी दुकान अशी दुकाने आहेत. काही दिवसापूर्वी रेशन दुकान बंद केलेले आहे. सदरच्या संस्थेवर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार चांगोजीराव उर्फ आबासाहेब देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील अशा दिग्गज मंडळींनी चेअरमनपदाची धुरा सांभाळलेली आहे. सदरची संस्था माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठनेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू असतो. सध्याचे चेअरमन बाळासाहेब देशमुख व सचिव मोहनराव देशमुख यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संस्था चालवून सभासदांचे हित जोपासलेले आहे. संस्थेची बिनविरोध परंपरा आजही कायम आहे. थोड्याच दिवसांमध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन यांच्या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर होतील.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशीलभैया गतीमान युगाचा कृतिशील नेता – संग्रामसिंह रणनवरे इनामदार.
Next articleअकलूज येथे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून नो कंम्प्लेंन डे टीमचा केला सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here