अकलूज विकास सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण आसबे तर व्हा. चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सन्मान संपन्न

संग्रामनगर ( बारामती झटका केदार लोहकरे यांजकडून )

अकलूज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण (तात्या) आसबे तर व्हाईस चेअरमनपदी योगेश देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अकलूज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन 2021-22 ते 2026-27 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक संस्थेचे संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील व शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली पार पडली. बिनविरोध निवडीची परंपरा स्थापनेपासूनची आज १०७ वर्षानंतरही या संस्थेने कायम राखली आहे. नूतन चेअरमन लक्ष्मण (तात्या)आसबे, व्हाईस चेअरमन योगेश देशमुख व नूतन संचालक मंडळ यांचा सत्कार विजयसिंह मोहिते -पाटील व जयसिंह मोहिते -पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

अकलूज विकास सोसायटीची स्थापना १९१५ साली झाली असून संस्थेची सभासद संख्या ६२१ आहे. शेअर्स भागभांडवल ५५ लाख असून बॅंकेकडे १७ लाख शेअर्स व रिझर्व्ह फंड ९८ लाख जमा आहे. संस्थेचे अकलूज शहरात अद्ययावत कपड्यांचे दालन असून शेतकऱ्यांसाठी खत दुकान सुरु आहे. संस्थेने ३ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून १०० टक्के वसूली देणारी ही एकमेव सोसायटी असल्याचे संस्थेचे सचिव मोहनराव देशमुख यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे नूतन संचालक प्रतापराव देशमुख, लक्ष्मण इंगोले, विजयकुमार सावंत, संभाजीराव देशमुख, रामदास गायकवाड, बलभिम साठे, विजयालक्ष्मी कुरुडकर, वनिता माने, कुंडलिक एकतपुरे, अशोक नरुटे, निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. राऊत यांच्यासह सभासद, अधिकारी व कामगार उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतांदुळवाडी सोसायटीत मोहिते पाटील दोन्ही गटाचा धुरळा उडाला पॅनलचा सुपडासाफ सर्व उमेदवारांचा त्रिफळा अडीचशे मतांच्या फरकाने उडवला.
Next articleनातेपुते येथे ‘करे हॉस्पिटल बाल रुग्णालय’ चा भव्य उद्घाटन सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here