माळशिरस तालुक्यात खड्ड्यामुळे वाहनधारकांना त्रास तर, खड्डे भरताना बांधकाम विभाग व ठेकेदारांना अडचणी
अकलूज ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यात अनेक रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झालेली आहे. काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी बिकट परिस्थिती झालेली आहे. माळशिरस तालुक्यात खड्ड्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे. सध्या अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. खड्डे भरताना बांधकाम विभाग व ठेकेदार यांना अडचणी येत आहेत. अकलूज-वेळापूर रस्त्याच्या दुरुस्तीला व खड्डे भरण्याच्या कामाला गती आलेली आहे. माने पाटील कन्स्ट्रक्शन व देशमुख कन्स्ट्रक्शन यांचे रस्ते दुरुस्ती व खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांच्या मार्गदर्शनाखाली भर उन्हात सुद्धा सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता श्री. लीलाधर डाके व शाखा अभियंता जाधव मॅडम ठेकेदाराकडून दर्जेदार काम करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्याच्या कामावर येऊन सूचना करीत आहेत.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी पूर्ण झालेली आहे. काही ठिकाणी सुरू असून उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अकलूज-वेळापूर रस्त्यावर वाहतूक वाढलेली आहे.

या रस्त्याने सहकार महर्षी साखर कारखाना, दि सासवड शुगर माळीनगर व इतर कारखान्याकडे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. काम करीत असताना येण्या जाणाऱ्या वाहनांची अडचण सुद्धा काम करणाऱ्या ठेकेदारांना होत आहे. खड्डे भरताना किंवा बीबीएम कार्पेट करताना काम सुरू असताना अवजड वाहन गेले तर तयार केलेला रस्त्याचे व खड्ड्याचे काम उचकटून निघते.
अंदाजपत्रक तयार करीत असताना खड्ड्यांपेक्षा ज्यादा खड्डे पावसामुळे तयार झाले आहेत. त्यामुळे ठेकेदाराला खड्डे बुजवीत असताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. त्यातच वाहनाच्या वाहतुकीमुळे अजून समस्या वाढत आहेत. त्यामुळे ठेकेदार हैरान झालेले आहेत. खड्ड्याचे काम परवडत नसताना सुद्धा काम करण्याचे सुरू आहे. नागरिकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रवास करीत असताना जेणेकरून बांधकाम विभाग व ठेकेदार यांना डबल काम करण्याचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng