अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांची मंत्रालयात उपसचिव पदावर बढती….

अकलूज (बारामती झटका)

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूजचे कार्यकारी अभियंता निरंजन अरविंद तेलंग यांची मुंबई मंत्रालय येथे उपसचिव पदावर बढती झालेली आहे. श्री. निरंजन अरविंद तेलंग यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी १ या पदावर संचालक अभियांत्रिकी अधिकारी महाविद्यालय नाशिक ४ या ठिकाणी सुरुवात करून सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ-कणकवली, जागतिक बँक प्रकल्प विभाग नागपूर, रोहयो (सा.बां.) विभाग गोंदिया, सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंदिया, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ सार्वजनिक बांधकाम नागपूर या ठिकाणी सहाय्यक श्रेणी अभियंता या पदावर काम केलेले आहे.

त्यांना कार्यकारी अभियंता या पदावर बढती मिळाल्यानंतर जागतिक बँक प्रकल्प विभाग नागपूर, सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ गडचिरोली, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ (सा.बां.खाते) नागपूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम (इमारत) विभाग पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज अशा ठिकाणी कार्यकारी अभियंता पदावर काम केलेले आहे. श्री निरंजन तेलंग यांना अकलूज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता या पदावरून बढती मिळालेली असून मुंबई मंत्रालय येथे उपसचिव पदावर ते कार्यरत आहेत. उपसचिव हे अधीक्षक अभियंता यांचे पद आहे.

त्यांच्या पदोन्नतीने अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकेंद्रीय जलशक्ती मंत्रालय कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड…
Next articleगोरडवाडी येथे बिरोबा यात्रेनिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here