अकलूज (बारामती झटका)
अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांना मंत्रालय मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपसचिव पदावर बढती मिळाल्यानंतर रिक्त झालेल्या पदी सुनीता पाटील यांची नियुक्ती झालेली आहे.
सुनिता पाटील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था धाराशिव येथे कार्यरत होत्या. त्यांच्याकडे अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या पदी विलास मोरे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र रस्ते ग्रामीण विकास संस्था सोलापूर येथून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था धाराशिव येथे बदली झालेली आहे.
सुनिता पाटील मॅडम यांनी अकलूज सार्वजनिक बांधकाम उपविभागांमध्ये उप अभियंता पदावर काम केलेले होते. त्यांची पदोन्नती कार्यकारी अभियंता पदावर झालेली होती. पुन्हा त्यांना अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये कार्यकारी अभियंता पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng