अकोला (बारामती झटका)

अकोला शहरामध्ये गोरक्षण संस्थानच्या मागे, दत्त कॉलनी गोरक्षण रोड श्री गणेश राव पाटील लांडे यांच्या घराजवळ दि. ९-११-२०२१ ते १६-११-२०२१ पर्यंत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण व संगीतमय श्रीमद् भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून गजानन विजय ग्रंथ पारायण व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज नावकार यांचे असून भागवताचार्य ह.भ.प. श्री. गणेश महाराज शेटे यांच्या रसाळ वाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन होणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये सकाळी काकडा भजन, दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ व रात्री सात ते दहा वाजेपर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा राहील.कथा संचामध्ये विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, विलास महाराज कराड, प्रदीप महाराज गायकवाड, रामेश्वर महाराज गाडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर यांची उपस्थिती राहील. दि. १६-११-२०२१ ला सकाळी होम विधी पार पडून कॉलनीमधून ग्रंथदिंडी सोहळा निघणार आहे व सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ह.भ.प. श्री. अरुण महाराज लांडे पारस यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम व भाविकांकरिता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अकोला शहरातील जास्तीत जास्त भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, ही विनंती आयोजक मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng