मुंबई (बारामती झटका)
अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा ‘पहिला पाऊस’ हा विषय होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
लावणी म्हणजे लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकारच होय. साहित्यिक दृष्ट्या विचार करता लावणीच्या सर्व अंगांचा योग्य पद्धतीने विकास साधता आला तर लावणी लेखन करणे शक्य ठरते. या लावणीला सन्मानाने जगासमोर पुन्हा नव्याने आणण्यासाठी अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूहाचे संस्थापक योगेश चाळके सर यांनी सन २०१८ पासून ते आजपर्यंत बरेच प्रयत्न केले आहेत व अशाच स्पर्धा ब-याचवेळा आयोजित करुन लावणी साहित्य रसिकप्रिय करण्यासाठी त्यांची धडपड आहे.
पहिला पाऊस … या विषयावर ज्या लावणी रचनांची झालेली निर्मिती फारच सुंदर होती. बऱ्याच नवीन सदस्यांनी स्पर्धेला मोठ्या प्रमाणात भाग घेवून प्रतिसाद दिला. स्पर्धेमधील स्पर्धक यांना पहिला पाऊस या विषयाला जेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, तेवढेच गुणांकन करताना अखिल महाराष्ट्र साहित्य मंचाचे सन्माननीय परिक्षक योगेश चाळके सर अर्थातच मुक्तासुता यांनी अतिशय विचार पूर्वक परिक्षण करुन लावणी स्पर्धक यांना न्याय मिळवून दिलेलेला आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धक यांच्या लावण्या परिक्षकांजवळ प्रशासक मंडळाने योग्य व चिकित्सक पध्दतीने निकाल जाहिर केला. तो याप्रमाणे –
सर्वोत्कृष्ट
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे. उत्कृष्ट :-सौ. गीता मुळीक….
प्रथम:-अनिता गुजर..
द्वितीय:-रेखा देशमुख,सौ.कल्पना टेंभूर्णीकर
तृतीय
अंजुम अकील शेख,रेखा चितळे…
चतुर्थ:’-एकनाथगायकवाड ,सौ.प्रिया भालके.,डॉ. जतीनबोस काजळे
पंचम,संजय कृष्णा तांबे,सौ. विजया शिंदे,सौ.सुरेखा अण्णासो वाडकर..
उत्तेजनार्थ
अनंत पांडुरंग पाटील..सुभद्रसुत आंधळे,प्रदीप बोरकुटे.,रेणुका जोशी…,सौ. नीलिमा भोंग.श्रीनिवास गडकरी,शंकर भगवंता शिंदे., मनीषा दीपक सामनेरकर,नलिनी पवार
या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशासक मंडळ सौ. मेघना पाटील, श्री. अशोक कांबळे, सौ.किरणताई मोरे चव्हाण सौ. शिल्पा सकळकळे, सौ. ज्योती अहिरे, सिंधू बोदेले यांनी यशस्वी स्पर्धकांचे कौतुक केले व सन्मान पत्र ऑनलाईन देऊन गौरवण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रिया मयेकर, संस्थापक योगेश चाळके अर्थात मुक्तासुत अखिल महाराष्ट्र साहित्य मंच लावणी समूह यामध्ये सर्वांनी अधिक मेहनत केली. लावणी समूहामध्ये साहित्यिक अधिकाअधिक प्रगती करत आहे, याचे सर्व श्रेय योगेश चाळके अर्थात मुक्तासुत सर यांना जाते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng