अखेर कोरोनाकाळ संपल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आनंदी आणि उत्साही वातावरणात सुरू.

नीरा नरसिंहपूर (बारामती झटका)

नीरा नरसिंहपूर ता. इंदापूर येथील श्री चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते महाविद्यालय तसेच श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नीरा नरसिंहपूर या दोन्ही महाविद्यालयांमध्ये कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने बारावी परिक्षेची सुरुवात झाली. याप्रसंगी दोन्ही बोर्डांनी एकदम अशा चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था त्याच प्रमाणे सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था केली होती. तसेच पोलीस स्टेशनचे पो. कॉ. सुहास सिकंदर आरणे तसेच पो. कॉ. एस. ए. गुंजाळ आणि पोलीस मित्र गायकवाड साहेब यांनी या महाविद्यालयांवर आपले कर्तव्य पार पाडले.

याप्रसंगी चैतन्य विद्यालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत दंडवते, प्राचार्य गोरख लोखंडे, प्रशांत सरवदे, अध्यक्ष अभय वांकर सर इत्यादी उपस्थित होते. श्री शिव-पार्वती इंग्लिश मीडियम  प्राचार्य रविराज काकडे सर, केंद्र उपसंचालक राजेंद्र मोहिते सर, बिल्डींग कंडक्टर अतुल हावळे सर, अविनाश शिंदे सर, साठे सर, इत्यादी उपस्थित होते. इंग्रजी विषयाचा पेपर हा अतिशय शिस्तबद्ध वातावरणात विद्यार्थ्यांनी पूर्ण केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसमध्ये झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन.
Next articleपालकमंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही-सचिन जगताप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here