….अखेर खुडूस गावठाण व परिसराचा सिंगल फेजचा प्रश्न माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटला.

सिंगल फेज चालू होणे पदाधिकारी व ग्रामस्थांचा विजय आहे सिंगल फेज अठरा तासावरून चोवीस तासासाठी सुरू होण्यास लढा चालूच ठेवणार – माजी सरपंच शहाजीकाका ठवरे.

सत्ता असो नसो, जनतेच्या व ग्रामस्थांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार – शहाजीकाका ठवरे

माळशिरस ( बारामती झटका )

खुडूस ता. माळशिरस येथील गावठाण व परिसराचा सिंगल फेज अनेक दिवसाचा प्रश्न होता. यासाठी खुडूस गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन आले होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता ओमासे यांना आंदोलनाचा इशारा दिलेला होता. माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या लढ्याला यश आलेले असून खुडूस गावठाण व परिसराचा सिंगल फेजचा प्रश्न सुटलेला आहे. सध्या अठरा तासासाठी सिंगल फेज सुरू झालेली आहे. मात्र, 24 तास सिंगल फेज लाईट सुरु होण्यासाठी लढा चालूच राहणार असल्याचे माजी सरपंच शहाजी काका ठवरे यांनी सांगून खुडूसच्या ग्रामस्थ व जनतेच्या अडीअडचणी व सेवेसाठी कायम तत्पर असल्याचे बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.
माजी सरपंच शहाजी काका ठवरे यांनी पुढे बोलताना सांगितले कि, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना दि. 04/12/2020 रोजी निवेदन दिले होते. त्यावेळेस पंचायत समिती सदस्य अजय सकट, माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे, राष्ट्रवादी युवा तालुका उपाध्यक्ष धनाजी साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अकलूजचे महावितरण कार्यकारी अभियंता ओमासे यांना दि. 29/12/2021 रोजी निवेदन दिलेले होते. त्यावेळेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पल्लवी साठे यांच्यासह गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरच्या निवेदनामध्ये खुडूस ता. माळशिरस येथील ग्रामस्थांनी खुडूस ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावांतर्गत सिंगल फेज तात्काळ सुरू करण्याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी लि. अकलूज ता. माळशिरस यांच्याकडे निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये खुडूस ग्रामस्थांनी खुडूस हे गाव पुणे-पंढरपूर संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर असून या गावची लोकसंख्या सुमारे 8 हजाराचे वरती आहे. खुडूस या गावी सिंगल फेज मंजूर होणेबाबत गावकऱ्यांची पूर्वीपासून मागणी होती व आहे. यापूर्वी याबाबत दि. 04/12/2020 रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांनाही निवेदन दिले होते. त्यांनी खुडूस गाव अंतर्गत सिंगल फेज सुरू करणे बाबत सूचनाही केल्या होत्या, तरीसुद्धा आज अखेर खुडूस गावामध्ये सिंगल फेज चालू केलेली नाही. खुडूस गावामध्ये अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. सध्या खुडूस गावामध्ये लाईट ही अनियमित असल्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.

खुडूस गावाला सिंगल फेज नसल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत असून त्यामुळे गावात सिंगल फेज लाईट लवकरात लवकर चालू करावी, याबाबत यापूर्वीही तोंडी व लेखी स्वरूपात संबंधित खात्याकडे कळवूनही याबाबत वेळ काढू भूमिका घेतली जात असल्याचे यात म्हटले आहे.

खुडूस ग्रामपंचायत अंतर्गत तात्काळ सिंगल फेज योजना चालू करण्यात यावी न झाल्यास आम्ही समस्त खुडूस मधील सर्व ग्रामस्थ मिळून दि. 10/01/2022 रोजी सकाळी 9 वा. खुडूस या गावी एसटी स्टँड समोर रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, असे सदर दिलेल्या निवेदनात म्हटले होते. सदर निवेदनात ग्रामस्थांच्या सह्या आहेत व सहीनीशी हे निवेदन दिले होते. सदरच्या निवेदनावर ॲड. शहाजी ठवरे, ॲड. सिताराम धुळा झंजे, बलभीम शिवाजी झंजे, तानाजी बापू जानकर, देविदास संभाजी तांबवे, रामचंद्र मुरलीधर चौगुले, अनंतराव विठ्ठल ठवरे, भिमराव आण्णा ठवरे, संभाजी ज्ञानदेव शिंदे, अनिल हनमंत दोलतडे, जगन्नाथ सायबू कांबळे, उत्तमराव विठोबा वळकुंदे, धनाजी ठवरे, सादिक मुनीम पिंजारे, तात्यासाहेब ज्ञानदेव ठवरे, आप्पा शिवाजी झंजे, डॉ. चेतन ज्योतिराम शिंदे, महादेव शिवाजी सरगर, सदाशिव बाबुराव ठवरे, डॉ. तुकाराम बापू ठवरे, पोपट रावसाहेब बनकर, विष्णू बाळू चौगुले, छगन बापू ठवरे, एकनाथ अरविंद ठवरे, बबन जगन्नाथ ठोंबरे, रविंद्र राजेंद्र कांबळे, सिद्धार्थ लक्ष्मण कांबळे, अंकुश हरिदास कांबळे, चंद्रकांत शिवाजी शिंदे, कल्याण शहाजी मोटे, प्रताप रावसाहेब ठवरे, देवेंद्र गजेंद्र कांबळे, देविदास बापू हंडे, सतीश लक्ष्मण बनकर, धनाजी बापू साठे, दत्तू खंडू कांबळे पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), सिद्धार्थ भीमराव काटे, सागर युवराज लोंढे, शामराव विठ्ठल जानकर, सौ. पल्लवी विनायक साठे, माऊली भाऊ सरगर, सचिन भीमराव भानवसे, धनाजी नारायण कुलाळ, दुर्योधन दत्तू बनकर, तानाजी चांगदेव साठे, प्रशांत तानाजी राऊत, केशव नारायण ठवरे, प्रकाश महादेव ठवरे, तानाजी शिवाजी ठवरे आदींनी सह्या केल्या आहेत.

पुढे बोलताना माजी सरपंच शहाजीकाका ठवरे यांनी सांगितले कि, महावितरण कंपनीने आम्हाला रास्ता रोको करण्यापासून परावृत्त केले. लवकरच आपला अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या आदेशाने सोडविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही रास्तारोको केला नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सिंगल फेज सुरू केलेले आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आलेले आहे. सध्या सिंगल फेज 18 तास सुरू आहे 24 तास सुरू करण्यासाठी लढा चालूच ठेवणार असल्याचे सांगून सत्ता असो अथवा नसो ग्रामस्थांची व जनतेची सेवा करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, असे बारामती झटक्याशी बोलताना संघर्ष नायक शहाजीकाका ठवरे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
Next articleमेडद येथील मातोश्री निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चाय पे चर्चा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here