….. अखेर संगनमताने प्रांतधिकारी डॉ. विजय देशमुख व शेतकऱ्यांचा अपहार चव्हाट्यावर.

भूसंपादन जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांची खाती बंद करून उताऱ्यावर बोजा कारवाईस सुरुवात.

बारामती झटका वृत्तामुळे तीन महिने झोपलेल्या मुर्दाड प्रशासनाला खडबडून जाग आली.

अकलूज (बारामती झटका )

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील वेळापूर ता. माळशिरस येथील गट नंबर 1059 भूसंपादन मोबदला देत असताना प्रांताधिकारी व प्रांत कार्यालयातील कर्मचारी आणि शेतकरी यांच्या संगनमताने शासकीय पैशाचा अपहार बारामती झटका वृत्ताने चव्हाट्यावर आणल्याने तीन महिने झोपलेल्या मुर्दाड प्रशासनाला खडबडून जाग आली आणि भूसंपादन जमिनीच्या मोबदल्याची शेतकऱ्यांची बॅंकेतील खाते बंद करून उताऱ्यावर बोजा चढवून पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांनी कार्यालयामार्फत क्र. भूसं. एस आर क्र/ 05/2018 दिनांक 27 /2/20 21 अन्वये जमीन गट नंबर 1059 मधील संपादित क्षेत्र 4925 चौरस मीटर इतके क्षेत्र संपादित होत असलेबाबत काढण्यात आलेली होती. तथापि दरम्यानच्या काळात होणारे खातेदार यांचेमध्ये कोणाची किती क्षेत्र संपादनामध्ये बाधित होत आहे, याबाबत खात्री नसल्याने श्री. व्ही. जी. वाळके सर्वेअर यांनी दि. 5/4/2021 रोजी जागेवर जाऊन समक्ष मोजणी केली असता सदर गट नंबर 1059 मध्ये 574 चौरस मीटरचे छेत्र संपादित होतं असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने ऑटोकॅडला तपासणी केली असता सदर गटांमधील क्षेत्र 574 चौरस मिटर क्षेत्र संपादित होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरी त्या अनुषंगाने आपणास क्र. भूसं. एस आर क्र/ 05/2018 दि. 27/2/2021 अन्वये देण्यात आलेली 4925 चौरस मीटरची नुकसान भरपाई रद्द करून आपणास गट नंबर 1059 मधील 574 चौरस मीटर संपादित क्षेत्राची दुरुस्त नोटीस देण्यात येत आहे, अशी नोटीस दि. 10/05/2021 रोजी देण्यात आली होती.

तत्कालीन प्रांताधिकारी शमा पवार यांनी 2 कोटी 85 लाख 21 हजार 811 रुपयाची नोटीस रद्द करून 30 लाख 82 हजार 984 रुपयाची नोटीस दिलेली होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये शमा पवार यांची सोलापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बदली होऊन त्यांच्या जागी डॉ. विजय देशमुख यांची प्रांताधिकारी उपविभागीय कार्यालय अकलूज येथे बदली झालेली होती. सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी माळशिरस उपविभाग अकलूजचे डॉ. विजय देशमुख यांनी दि. 10/05/2021च्या भूसंपादन संकलन नोटिशीप्रमाणे चंद्रकांत गणपत माने देशमुख व दत्तू गणपत माने देशमुख यांना भूसंपादनाचा मोबदला देणे गरजेचे असताना आर्थिक हितसंबंध प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आणि शेतकरी संगनमताने अपहार करण्याच्या उद्देशाने अडीच कोटीच्यावर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आरटीजीएसने वितरित करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे सी सी फॉर्मवर महिना होता मात्र, तारीख नव्हती. सदरच्या प्रकरणी दिपक माने देशमुख यांनी जिल्हाधिकारी व प्रांत कार्यालय यांच्याकडे कित्येक दिवस तक्रार करून हेलपाटे घातलेले होते. आर्थिक हितसंबंधांमुळे प्रशासन सुस्त होते. बारामती झटका वृत्तामुळे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि शेतकऱ्यांची खाती सील करण्यात आलेली आहे. वसुलीसाठी चंद्रकांत गणपत माने यांचे दोन उतारे व दत्तू गणपत माने यांचा एक उतारा या तीन उताऱ्यावर फेरफार क्र. 13738 क्रमांकाने दि. 17/18/2022 रोजी बोजा इतर अधिकारात सोडून सदर ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांचे पूर्वपरवानगीशिवाय जमिनीची खरेदी-विक्री आदलाबदल बक्षीस पत्र गहाणखत मृत्युपत्र करारपत्र व अन्य कोणतेही हस्तांतरणास बंदी घालण्यात आलेली आहे. सदरच्या उताऱ्यावर कोणताही फेरफार प्रलंबित नाही, असा शेरा मारलेला आहे. शेतकऱ्यांची इतर बँकात असणारी खाती शोधाशोध सुरू आहे. सदर प्रकरणी अधिकारी व शेतकरी यांनी संगनमताने शासनाच्या पैशाचा अपहार करण्याच्या उद्देशाने केलेला सर्व खटाटोप आहे यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. बारामती झटका वेळोवेळी माहिती जनतेसमोर मांडून भ्रष्ट प्रशासनाची लक्तरे काढली जाणार आहेत. प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख रजेवर असताना बारामती झटका वृत्ताने जिल्हाधिकारी यांना रुजू होण्यास सांगून तातडीने कारवाई करण्यास सूचना केल्या. त्याप्रमाणे प्रांताधिकार्‍यांनी स्वतः बँकेत येऊन खाते सील केलेली, प्रशासनात पहिलीच घटना असावी. म्हणजेच घटनेचे किती गांभीर्य आहे, अशी चर्चा महसूल प्रशासनात रंगलेली आहे. अधिकारी व शेतकरी यांचा समन्वय कसा झाला याची सर्व माहिती काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे जेणेकरून अशा बेकायदेशीर गोष्टीला आळा बसावा.

माळशिरस तालुक्यातील भूसंपादनात कोणाची काही अडचण असल्यास बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या नंबरशी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात अनुसूचित जाती जमातीसाठी अच्छे दिन…
Next article…अखेर भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने केले रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here