…..अखेर सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमोडे यांच्या बेकायदेशीर रेशनधान्य काळा बाजाराच्या पाठपुराव्याला यश….

गारवाड पाटी येथे ट्रकमध्ये ७० किलोच्या १०९ गोण्या गव्हाच्या काळ्या पिशवीतून बाजारात जाणारी गाडी पकडली…

माळशिरस ( बारामती झटका )

भांबुर्डी ता. माळशिरस या गावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमोडे यांनी गारवाड पाटी येथे काळ्या ठिक्याच्या पिशवीमध्ये १०९ गोण्या ७० किलो प्रमाणे रेशनच्या गव्हासारखा असणाऱ्या गव्हाच्या गोणीचा ट्रक एमएच १२ एल टी ७६७७ हा संशयास्पद ट्रक रेशनचा माल घेऊन जाणारा असल्याने पकडून आणून माळशिरस पोलीस स्टेशन येथे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अधिकारी यांच्या समक्ष पोलीस स्टेशन येथे उभा केलेला असल्याने सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमोडे यांच्या प्रयत्नाला यश आलेले आहे.

सदरचा ट्रक माळशिरस पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उभा करण्यात आलेला आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकारी सदरच्या गोण्यामधील गव्हाची पाहणी करून पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. सदरचा गहू रेशनचा असावा, अशा चर्चेला उपस्थित असलेल्या लोकांच्या गहू पाहिल्यानंतर सुरुवात झालेली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमोडे यांनी तहसील कार्यालय येथे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना निवेदने व वेळोवेळी भेटी देऊन तोंडी तक्रारी केलेल्या होत्या. परंतु तहसील कार्यालयाकडून डोळेझाक केलेली होती. सामाजिक कार्यकर्ते विष्णू वाघमोडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कोणत्या रेशन दुकानदाराकडे गहू, तांदूळ कोणत्या वेळी बेकायदेशीर मार्गाने विक्रीसाठी जातो, याच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्याचे काम सुरू होते. आज प्रत्यक्ष मालासह ट्रक सापडलेला असल्याने पुरवठा विभाग व पोलीस स्टेशन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. अद्यापपर्यंत पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला नाही.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्राथमिक शिक्षिका ते डॉक्टरेट व्हाया उप मुख्य कार्यकारी अधिकारी…
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गावातील ग्रामसेवक सचिन बनकर यांची दप्तरनिहाय चौकशी करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here