…अखेर स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आले यश

निद्रोष मुक्तता झाल्याने दहा हत्तीचं बळ मिळाले – भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना‌

इस्लामपूर (बारामती झटका)

दि. 5 जुलै 2020 रोजी खा.राजु शेट्टी यांनी दुध दर वाढीसाठी पुण्यात राज्यात 21 जूलैला दुध बंदची हाक देत पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली. त्यावेळी गाईच्या दुधाला 16 रुपये प्रति लिटर भाव होता. पाण्याच्या बाटलीचा दर 20 रुपये, पशुखाद्य भाव 1200 रुपयेच्या पुढे गेला. ग्रामीण भागाचे अर्थकारण दुध धंद्यावर चालते. लेकराबाळाच्या तोंडावर हात मारून डेअरीला दुध घालणारी, कायम शेणामुतात हात असणारी आमची मायमाऊली, या शेतकऱ्यांना दर परवडवत नव्हता, हे मात्र खर होते. पण आंदोलन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं करणार म्हणल्यावर राज्यातील दुध उत्पादक शेतकरीही मोठ्यां अपेक्षेणे पाहत होता. शेतकऱ्यांना माहित होते कि, मा. खा. राजु शेट्टी यांनी आंदोलन हाती घेतले आहे म्हणजे आंदोलन यशस्वीरित्या पार पडणार.

गावोगावी दुध बंदबाबत बैठका पार पडल्या. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वखाली बैठका होत होत्या. जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा, चितळे, प्रचिती, थोटे, वसंतदादा, हंटसन, क्रांती, सह दुध संघाना भेटी देऊन दुध संघ बंद ठेवा, अशा सुचना ही दिल्या गेल्या. जिल्ह्यातील स्वभिमानीच्या सुचनेला मान्यताही दिली. दुध संघ बंद ठेवण्याची ग्वाही दिली. दुध आंदोलन यशस्वीरित्या पार पाडणार याची खात्री पटली, पण यात विघ्नसंतोषी कोल्हापुर जिल्ह्यातील मस्तवाल गोकुळ दुध संघाने स्वाभिमानी संघटनेच आंदोलन मोडीत काढण्यासाठी दुध संघ चालु ठेवणारं असा इरादा केला.

शेवटी खासदार साहेबांचा आदेश आम्ही सांगलीकर कसे मोडणार आदेश तो आदेशच – भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना‌

आमच्या संघटनेचा मास्टर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेशभाऊ खराडे यांच्या नेतृवाखाली दि. 20 जुलै पहाटेच्या वेळी रोजी येलुर फाट्यावर आम्ही मी भागवत जाधव, तानाजीराव साठे, रविकिरण माने, रमेश पाटील, प्रभाकर पाटील सह जिल्ह्यातील सर्वे कार्यकर्ते, टिव्ही चॅनेल, पत्रकार सह कार्यकर्ते पुणे, बेगलोर महामार्गावर पोहोचलो. दुरवर असलेले राहुल कोळी, संजय बेले यांनी नुसता इशारा केला. आम्ही दुध टँकर समोर गेलो. किमान 25 हजारच्या लिटर वर दुध सोडले गेले, पाहतापाहता देशातील सकाळच्या सात बातमी पत्रात टिव्ही चॅनेलवर ब्रेकींग न्यूज झाली. दुध आंदोलन यशस्वीरित्या पार पाडले. दोन दिवसात खा‌. राजु शेट्टी साहेब व दुग्धविकासमंत्री सुनिल केदार यांच्या मंत्रालयात बैठक झाली. आंदोलन फलीट दुध उत्पादक शेतकर्यांना पाच रुपये वाढीव भाव मिळाला.

महेश खराडे व माझ्यासह पाच जणावर कुरलुप पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. गेल्या तीन वर्षांपासुन इस्लामपूर कोर्टात तारिख पे तारिख चालु होत्या. कार्यकर्ताना खुप त्रास सहन करावा लागत. पण आमचे कार्यकर्ते कधिही डगमले नाहीत. आमचा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास होता. आज न्याय देवतेने आम्हा तमाम दुध उत्पादक शेतकऱ्यांचा लढा लढत असताना आज आम्ही निद्रोष मुक्त झाळो. ॲड. एस. यु. संन्दे व ॲड. जमिर यांनी विनामोबदला खटल्यांचे काम पाहिले. निद्रोष मुक्ताता झाली हे कळताच आमचे शेतकरी नेते राजु शेट्टी इस्लामपूर कोर्टात येऊन त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सह सर्वांचं सत्कार केला. आम्हा कार्यकर्त्यांच्या लढ्याला दहा हत्तीचं बळ मिळाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleयुवा नेते सौरभ जाधव यांचे बंधू सागर जाधव यांच्या विवाह सोहळ्यास लोकप्रिय आ. रामभाऊ सातपुते यांची उपस्थिती
Next articleमाळशिरस तालुक्यातील १४३ विकास सेवा सोसायट्यांपैकी १०३ सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here