स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा प्रमुख साहिल आतार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका घेऊन काम सुरू
वेळापूर (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विधानसभा अध्यक्ष साहिल आतार यांनी वेळापूर-पिसेवाडी येथील डी फोर कॅनॉलवरील पुलावर मुरूम टाकण्यासाठी माळशिरसचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते. जर काम वेळेत पूर्ण झाले नाही तर, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला होता. सदर आंदोलनाचा धसका घेत प्रशासनाने वेळीच काम सुरू केले आहे.
मोजे पिसेवाडी हद्दीतील कॅनॉलचे अस्तरीकरण चालू आहे. सध्या पावसाळा चालू असल्यामुळे अस्तरीकरण करत असताना जड वाहतुकीमुळे कॅनॉलचा रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कॅनॉलवरील रस्ता दुरुस्त करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये जर रस्ता वेळीच दुरुस्त नाही झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या इशाऱ्याचा धसका घेऊन प्रशासनाने वेळीच कामाला सुरुवात केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng