अतिरेक्यांकडून वापर होत असल्याने ड्रोन चित्रीकरणाला ‘आषाढी’ त बंदी.

सोलापूर (बारामती झटका) लोकमत साभार

आषाढी यात्रा कालावधीत यंदा १२ ते १४ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.

३० जून ते १३ जुलै या आषाढीवारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतातून लाखो वारकरी येतात.

९ जुलै रोजी सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात. या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टीव्ही चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदेशात म्हटले आहे.

भोळ्याभाबड्या वारकर्‍यांना माहिती नसते
वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांन ड्रोनची कल्पना नसते. छायाचित्रण केले तर वारकऱ्यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) ३० जून ते १३ जुलैअखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचे पवार यांनी आदेशात म्हटले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleGreatest five Gulping down Hour or so Selections cura de el barco for Personal computer And initiate Mobile phones
Next articleवारीत तुमच्या घरी पाहुणा आला, तरीही आधी पोलिसांना कळवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here