अनादी कालापासून वारकरी संप्रदायात परिस्थिती गरिबीची मात्र, श्रीमंती मनाची याचा प्रत्यय आधुनिक युगात आला

माळशिरस येथील बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत असणारे किसन वसंत भिसे यांचा मनाचा मोठेपणा व प्रामाणिकपणा आदर्श घेण्यासारखा

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरातील बँक ऑफ इंडिया येथे खाजगी कर्मचारी म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत असणारे किसन वसंत भिसे यांचा मनाचा मोठेपणा व प्रामाणिकपणा याचा आदर्श घेण्यासारखा आहे. अनादी कालापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत सेना महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा अनेक संतांनी अनादिकालापासून वारकरी सांप्रदायात परिस्थिती गरीबीची श्रीमंती मनाची याचा प्रत्यय आधुनिक युगात किसन वसंत भिसे यांच्या वर्तनातून अनुभवयास आलेला आहे.

किसन वसंत भिसे यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. कोणाचाही आधार नाही, राहण्यासाठी श्री संत सावता माळी मंदिर आणि उदर निर्वाहासाठी बँक ऑफ इंडिया येथे झाडलोट, साफसफाई करून आपले जीवन जगत आहेत. पहिल्यापासून अध्यात्माचा वसा आणि वारसा त्यांच्याकडे आहे. प्रतिकूल परिस्थितीत साधुसंत आपले विचार व भूमिका यांच्याशी ठाम राहिले. समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. तसेच किसन वसंत भिसे यांनीही समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

बँक ऑफ इंडिया माळशिरस येथे नेहमी ठेवीदार, कर्जदार खातेदार, बचत गट अशा अनेक खातेदारांचे दैनंदिन व्यवहार सुरू असतात. मार्च एण्ड संपून दोन दिवसाची सुट्टी संपल्यानंतर सोमवारी नेहमीप्रमाणे बँक सुरू झाली. बँकेमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होती. बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी समाधान कुंभार, एडमिन मॅनेजर किरण प्रसाद, वरिष्ठ अधिकारी विक्रम लेदे, कृषी विभाग अधिकारी किरण भूसे, कॅशियर प्रणव गायकवाड, बँकेतील कर्मचारी ऋषिकेश पवार, संतोष पवार, अजय राठोड, विष्णू घाडगे, सुभ्रमन्नून नाईक, सुरज सावंत, गौरव पंचवाघ, मेजर बापूराव जाधव, बँक मित्र अमोल वायदंडे असे अधिकारी व कर्मचारी बँकेत कार्यरत होते. देशमुख पट्टा माळशिरस येथील इंद्रजीत विष्णुपंत देशमुख बँकेच्या कामानिमित्त बँकेत आलेले होते.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने खिशातून रुमाल काढताना किंवा मोबाइल काढताना त्यांच्या खिशातील एक तोळे सोने असलेली लहानशी पिशवी खिशामधून पडलेली होती. पडलेली पिशवी किसन वसंत भिसे यांना दिसल्यानंतर त्यांनी उचलून घेतली. त्यामध्ये काय आहे हे पाहिल्यानंतर त्यांना सोने दिसले. सोने पाहून किसन भिसे यांचे मन विचलित झाले नाही. त्यांनी उपस्थित ग्राहक व खातेदारांना विचारले कोणाचे काही हरवले आहे का त्यावेळेस उपस्थितांनी कोणाचेच काही हरवले नसल्याचे सांगितल्यानंतर किसन भिसे यांनी शाखाधिकारी समाधान कुंभार त्यांना सविस्तर माहिती सांगून त्यांच्याकडे सोन्याची पिशवी जमा केली. युवा नेते इंद्रजीत देशमुख यांच्या लक्षात आले आपल्या खिशातील सोन्याची पिशवी पडलेली आहे. त्यावेळेस त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. कुठेही सोने सापडले नाही.

शेवटचा प्रयत्न आपण बँकेत गेलो होतो‌. बँकेत चौकशी करण्याकरता आले. बँक मॅनेजर यांनी देशमुख यांच्याकडून खात्री करून घेतली. खात्री पटल्यानंतर शाखाधिकारी व बँकेतील कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रामाणिक खाजगी कर्मचारी किसन वसंत भिसे यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांना एक तोळे सोने त्यांचे त्यांना परत करण्यात आले. किसन भिसे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे. विश्व वारकरी सेनेचे सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास कदम पाटील यांनीही त्यांचे कोडकौतुक केलेले आहे. किसन वसंत भिसे यांच्या मनाचा मोठेपणा व प्रामाणिकपणा आदर्श घेण्यासारखा आहे. इंद्रजीत देशमुख यांनी संपूर्ण कपड्याचा पोशाख किसन वसंत भिसे यांना देऊन परिस्थिती गरिबीची मात्र श्रीमंती मनाची असणाऱ्या किसन भिसे यांचा सन्मान केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleह.भ.प. गायनाचार्य गलांडे महाराज लासुर्णे यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम.
Next articleमाढा तालुक्यातील 59 गावांना 15 व्या वित्त आयोगातून 2 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर – रणजितभैय्या शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here