………अन्यथा गुरसाळे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार.

पंचायत समिती सदस्य यांचे पती उद्योजक दत्तात्रय शेळके यांचा सामूहिक आत्मदहनात समावेश.

माळशिरस ( बारामती झटका )

गुरसाळे ता. माळशिरस येथील उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके, लहू महादेव मोरे, महादेव विलास मोरे, राजेंद्र गेना गाढवे, युवराज संजय गायकवाड, रामचंद्र मुगुटराव गायकवाड, तुकाराम पंढरीनाथ गायकवाड, विशाल संजय सावंत यांनी दि. 15 जानेवारी 2022 रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर संतोष माणिक पाटील यांनी दगडी खान ते पालखी पार रस्ता मोडलेला आहे. तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा आत्मदहन करणार आहोत, असे निवेदन माळशिरस तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार तूषार देशमुख यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी अकलूज, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ शिवपुरी मुळा यांना देण्यात आलेले आहे. सदर निवेदनावर माळशिरस पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या सौ. संगीताताई दत्तात्रय शेळके यांचे पतीराज उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे.

सदर निवेदनामध्ये ग्रामपंचायत कार्यालय गुरसाळे या कार्यालयाकडून श्री. संतोष माणिक पाटील यांनी गावातील दगडी खान ते पालखी पार रस्ता मोडलेला आहे, असे कळविण्यात आले आहे. सदरचा रस्ता तहसील कार्यालय माळशिरस रोजगार हमी यांचे पत्र क्रमांक 73 क्र 2011 दि. 30/4/2011 रोजी रोजगार हमीतून झालेला कळविण्यात आलेले आहे. तसेच श्री. संतोष माणिक पाटील यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय माळशिरस उपविभाग अकलूज यांचे आदेश क्रमांक खंडकरी शिवपुरी मळा क्रमांक एस आर क्रमांक 7 4 /20 13 दि. 13/8/2013 आदेशाप्रमाणे शेती महामंडळ यांचेकडून क्षेत्र वाटप करण्यात आले असून सदर आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीवर क्षेत्र वाटप केले आहे. अटी व शर्ती मधील गट क्रमांक 4 अन्वये वाटप केलेल्या जमिनीवरील रस्ते तथा जमिनीखालील पाईप लाईन व अन्य कोणतेही बांधकाम इतर खंडकर यांची अथवा त्यांच्या वारसांना कोणत्याही अडथळा येऊ नये. तसेच ते नादुरुस्त होतील असे कोणतेही कृत्य करू नये असे स्पष्ट नमूद केलेले आहे त्यानुसार आम्ही रीतसर कार्यालयास कळविले आहे. सदरचा रस्ता हा वैयक्तिक मालकीची नसून ग्रामपंचायत गुरसाळे यांच्या मालकीचा असून श्री. संतोष माणिक पाटील यांनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलेले आहे. त्याविषयी ग्रामपंचायत कार्यालय यांनी लेखी स्वरूपात आपल्या कार्यालयात कळविण्यात आलेले आहे. परंतु सदर बाबतीत आपल्या स्तरावरून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदरचा रस्ता हा आमच्या शेतीतील ऊस वाहतूक, दूध वाहतूक, पाणी व दळणवळण करण्यासाठी पिढ्यानपिढ्या गेली अनेक वर्षे झाली वापरत आहेत. सद्यस्थितीत श्री. संतोष माणिक पाटील यांनी सदर चा रस्ता गट नंबर 661, 660, 559 येथे खोदला असून येण्या-जाण्यास अडवणूक करत आहेत.

आम्ही व सर्व ग्रामस्थांनी व गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींना विचारपूस करून सामूहिक आत्मदहन दि. 15 जानेवारी 2022 रोजी करणार आहोत. आमच्या व्यथा सोशल मीडियावर फेसबुक लाईव्हद्वारे मांडून आत्मदहन करणार आहोत. आम्हाला आमच्या घरी येण्या-जाण्यासाठी कोणताही दुसरा पर्यायी रस्ता नसून आमच्या मुलामुलींना शाळेत दवाखान्यात जाण्या-येण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सद्यस्थितीमध्ये शेतीमध्ये उभा असलेला ऊस कारखान्यासाठी देण्यास पर्यायी रस्ता नाही ऊस कारखान्यास वाहतूक करता येत नसल्याने ऊस पेटवून देऊन स्वतः आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याने आम्ही आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनाद्वारे आपल्याला विनंती आहे की, आम्हाला न्याय मिळवून देऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून मिळावा, अन्यथा आम्ही निश्चित वेळेत आत्मदहन करणार आहोत. तरी सदर प्रकरणी कोणाची जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे निवेदनात नमूद केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस शहरातील सर्जे यांची कन्या व वावरे यांच्या सूनेला मिळाला बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान.
Next articleपळसमंडळ शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भरत अप्पाजी करे यांची बिनविरोध नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here