अपंग संघटनेचे नेते गोरख जानकर यांचेकडून तरंगफळ गाव कामगार तलाठी कार्यालयास खुर्च्या भेट

माळशिरस (बारामती झटका)

तरंगफळ गावाचे गाव कामगार तलाठी कार्यालय माळशिरस महसूल भवन येथे असून या कार्यालयाची इमारत मजबूत आणि दणकट आहे. परंतु आजपर्यंत या इमारतीची दुरुस्ती, कलरची कामे व ऑफिस मधील सोयीसुविधा अपुऱ्या प्रमाणात होत्या. म्हणून तरंगफळ गावच्या तलाठी आर. बी. तांबोळी मॅडम व तरंगफळ ग्रामस्थ यांच्या विचारातून व तरंगफळ ग्रामस्थांच्या सहकार्यातून तरंगफळ गाव कामगार तलाठी कार्यालय अत्यंत सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त आदर्श कार्यालय बनविण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गोरख जानकर यांनी या कार्यालयास खुर्च्या भेट म्हणून दिल्या.

यावेळी त्यांचे स्वागत तलाठी आर. बी. तांबोळी यांनी केले. यावेळी स्वस्त धान्य दुकान संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष महादेव तरंगे, तरंगफळचे माजी सरपंच सुजित तरंगे, आबासाहेब जगताप यांचेसह ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ऑफिसची राहिलेली कामे सुद्धा लोकसहभागातून करण्याचे नियोजन करण्यात आले. व तरंगफळमधील ग्रामस्थ शेतकरी व नागरिकांना या ऑफिसमधून वेळेवर कागदपत्रे व इतर सुविधा उपलब्ध होतील, असे तलाठी आर बी तांबोळी मॅडम यांनी सांगितले. यावेळी तरंगफळ ग्रामस्थांनी लोकसहभागातून ऑफिसच्या कामासाठी सहकार्याचे आवाहन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रमंचाची माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न.
Next articleमाळशिरस तालुक्याचा लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या तिन्ही सभागृहात एकाच वेळी आवाज घुमतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here