अभिनेते सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर यांनी माळशिरस तालुक्यातील धाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतला.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील अकलूज-सांगोला रोडवरील साळमुख चौक येथील जय मल्हार हॉटेल या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर यांनी जेवणाचा आस्वाद घेऊन ग्रामीण भागातील हॉटेलचे मालक विकास कोकरे यांचे कौतुक केले.मळोली ग्रामपंचायत हद्दीतील साळमुख चौकापासून सांगोला रोडकडे पाचशे मीटर अंतरावर हॉटेल जय मल्हार धाबा आहे.

माळशिरस तालुक्यात धाबा संस्कृती स्वर्गीय हनुमंतराव कोकरे यांनी सुरू केलेली होती. स्वतः ड्रायव्हर असल्याने अनेक ठिकाणी त्यांनी हॉटेल व धाब्यावर जेवण व मुक्काम केलेले आहेत. त्यांनी सर्वप्रथम पत्नीसोबत झोपडीमध्ये ढाबा सुरू केलेला होता. स्वर्गीय हनुमंतराव कोकरे यांचे दुःखद निधन झाल्यानंतर चिरंजीव विकास कोकरे यांनी दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये कामाला राहून हॉटेल व्यवसाय कसा करावयाचा याचा अभ्यास केलेला होता. हनुमंतराव कोकरे यांचे अपघाती दुःखद निधन झालेले होते. त्यांना एक लाखाचा शेतकरी विमा श्रीनिवास कदम पाटील यांनी मिळवून दिलेला होता. त्या पैशातून त्यांनी वडिलांचा व्यवसाय धाबा स्वतःच्या जागेत सुरू केला.

हनुमंतराव कोकरे यांना दोन चिरंजीव अरुण आणि विकास. दोघांनी व्यवसाय व्यवस्थित चालवून जय मल्हार धाबा सुप्रसिद्ध केला आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची पसंती वाढत गेल्याने अनेक सुविधा धाब्यावर उपलब्ध केलेल्या आहेत. हॉटेलमधून कुटुंबाची चांगली प्रगती झालेली आहे. सिनेअभिनेते सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर यांनी जय मल्हार धाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. टेकडीवर असणारे हवेशीर ठिकाण जय मल्हार हॉटेल सध्याच्या थंड वातावरणामुळे ग्रामीण भागातील महाबळेश्वर असल्यासारखे वाटते आहे. जय मल्हार हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊन ग्रामीण भागातील जेवणाचे कौतुक हॉटेलचे मालक विकास कोकरे यांचे केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनवी मुंबई शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक विजयराव माने यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा.
Next articleमाळशिरस तालुक्यात अनुसूचित जाती जमातीसाठी अच्छे दिन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here