अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा – सौ. रिज़वाना शेख

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन…

अकोला (बारामती झटका)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अभिनेत्री केतकी चितळे हिने लेखक नितीन भावे ह्याची आक्षेपार्ह कविता फेसबुकवर पोस्ट करून शरदचंद्रजी पवार साहेबांचा अपमान केलेला आहे. प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश निरीक्षक आदरणीय डॉ. आशाताई मिरगे यांच्या नेतृत्वात व अमरावती विभागीय अध्यक्ष वर्षाताई निकम व अकोला जिल्हा निरीक्षक सोनालीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अकोला महानगराध्यक्षा रिज़वाना शेख अजी़ज़ यांच्यावतीने जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये अभिनेत्री केतकी चितळे व लेखक नितीन भावे या दोघांविरुद्ध कलम 500, 501,505 तसेच 153 (ए), नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच केतकी चितळे हिची मानसिक स्थिती तपासून पहावे व मनोरुग्ण अभिनेत्री केतकी चितळे हीला इलाजासाठी लागणारा खर्च राष्ट्रवादी महिला काँग्रेस लावणार, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी महिला ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा सुषमाताई कावरे, असंघटित कामगार सेल अध्यक्षा अनिताताई दिघेकर, महानगर महासचिव शहनाज़बी शेख मुख्तार, पश्चिम ब्लॉक अध्यक्षा दीपाताई शेगोकार, माजी महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदाणीजी, राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्याक विभाग जावेदभाई जकरिया, माज़ी नगरसेवक अज़ीज़ शेख सिकंदर शेख रमज़ान, अबरार खान तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेंडेवाडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी खंडूआप्पा वाघमोडे, तर व्हाईस चेअरमनपदी आनंदा मारकड विजयी…
Next articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावतीने भाजपचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते महादेव कोळेकर यांचा सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here