महाराष्ट्रातील साखर सम्राट म्हणून वडिलोपार्जित साखरेवर राजकारण करणाऱ्या नेत्यांची दयनीय अवस्था.

दिल्ली ( बारामती झटका )
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीने काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपवासीय झालेले कारखानदार नेत्यांची दिल्ली येथे बैठक झालेली आहे. या बैठकीमधील झालेल्या विषयावरून अमितभाई, तुम्हीच आम्हाला वाचवा अशी भाजपवासीय साखर सम्राट नेत्यांची केविलवाणी अवस्था झाली असल्याची चर्चा साखर उद्योग व्यवसायामध्ये रंगलेली आहे.

महाराष्ट्रातील साखर सम्राट म्हणून वडिलोपार्जित साखरेवर राजकारण केलेली नामांकित घराण्यामधील प्रतिनिधी अमितभाई शहा यांची रावसाहेब दानवे व देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीने भेट घेतली. त्यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार व विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विद्यमान आमदार राहुल कुल, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मदन भोसले व अन्य शिष्टमंडळाने भेट घेऊन एफआरपी, कर्जाचे पुनर्गठन, थकबाकी, बंद असलेले कारखाने, इथेनॉल निर्मिती, सहकारी साखर कारखान्याला इन्कम टॅक्स नोटिसा अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे भाजपवासीय झालेल्या नेत्यांचा दिल्ली दौरा झालेला असल्याने साखर उद्योग व्यवसायांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng