विकास सेवा सोसायटीच्या मतदारांच्या होम टू होम व बांधावर जाऊन सभासद शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन हितगुज साधलेले ठरले फायद्याचे
वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वेळापूर, ता. माळशिरस या संस्थेच्या व्यवस्थापक समिती सदस्यांची निवडणूक सण 2021-22 ते 26-27 या कालावधीसाठी चुरशीच्या निवडणुकीत श्री अर्धनारीनटेश्वर शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 13 उमेदवारांनी दैदीप्यमान विजय मिळवलेला आहे. विकास सेवा सोसायटीच्या मतदारांच्या घरोघरी जाऊन होम टू होम व सभासद शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन भेटीगाठी घेऊन हितगुज साधल्याने फायदा झाला. सोसायटीच्या निवडणुकीतील विजयाचे खरे पडद्यामागील चाणक्य म्हणून अमृतभैय्या सूर्यकांत माने देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य लोकनेते स्वर्गीय सूर्यकांतदादा माने देशमुख यांनी 35 वर्ष सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली होती. स्वर्गीय सूर्यकांतदादांचं राजकारण अमरभाऊ आणि अमृताभैय्या यांनी जवळून पाहिलेले आहे. सूर्यकांतदादांचे अनेक पैलू राम-लक्ष्मण सारख्या अमरभाऊ आणि अमृतभैय्या यांनी आत्मसात केलेले होते. लोकनेते सूर्यकांतदादांचे अकाली दुःखद निधन झाल्यानंतर लहान वयामध्ये वडिलांच्या पश्चात जबाबदारी आलेली होती. विविध कार्यकारी सेवा सोसायटी व महादेव देवालय ट्रस्ट दोघे बंधू यशस्वीरित्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सहकार्याने पंधरा वर्ष सेवा सोसायटीचा कारभार गावातील ज्येष्ठ मंडळी यांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने चालवून पंधरा टक्के डिव्हीडंट सतत वाटलेला होता. अनेक वर्षाची बिनविरोध परंपरा विरोधकांनी मोडीत काढून निवडणूक लागलेली होती. पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने विरोधी गटाकडून चांगल्या बाजू झाकून वाईट बाजू उघड्या करण्याचे काम सुरू होते. अशावेळी अमृतभैया यांनी चाणाक्ष बुद्धीने ठराविक विश्वासू मित्रांना सोबत घेऊन डळमळीत झालेले मतदार स्थिर करण्याचे काम केलेले आहे. कित्येक सभासदांच्या घरी दोन दोन तीन तीन तास बैठक करून सभासदाच्या मनातील संभ्रम दूर करण्यात यशस्वी झालेले आहेत. निवडणुकीला राजकीय वळण लागलेले होते. माने देशमुख परिवार व नातेवाईक एकवटलेले होते. सूर्यकांतदादा यांच्यापासून सोबत असलेल्या माळी समाजाची सुद्धा चांगली साथ मिळालेली आहे. भूलथापा, प्रलोभन, आमिष अशा पद्धतीने विरोधी गटाकडून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता. विरोधकांच्या बारीक हालचालीवर अमृतभैय्या यांचे लक्ष होते. कर्जदार सभासद गटामध्ये सर्वात जास्त मतदान घेतलेले अमरसिंह माने देशमुख सर्वांना दिसतात मात्र, लक्ष्मणासारखे अमृतभैय्या माने देशमुख विजयाचे खरे शिल्पकार चाणक्य पडद्यामागे राहिलेले आहे.

श्री अर्धनारीनटेश्वर शेतकरी विकास पॅनलचे 13 उमेदवार यांच्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांना भेटीगाठी घेऊन हितगूज साधण्याचे काम शंकरराव रामचंद्र माने देशमुख, सतीशराव दिगंबर माने देशमुख, मारूतराव गणपतराव माने देशमुख, नारायणराव कृष्णराव माने देशमुख, विजयसिंह रंगराव माने देशमुख, पांडुरंग गोविंदराव माने देशमुख, महादेव धोंडीबा भाकरे, माणिकराव वामन चव्हाण, हनुमंतराव शंकरराव साळुंके, रामचंद्र शंकर माने, अमृतराज सूर्यकांत माने देशमुख, शंकरराव ज्ञानेश्वर काकुळे, दत्तात्रय गेना बनकर, पांडुरंग दत्तू सावंत, धनंजय विष्णू भाकरे, तानाजी हरिभाऊ मुंगूसकर, सुरेश महादेव पिसे, प्रताप शिवलिंग शिरसागर, मल्हारी भगवान बनकर, मिलिंद वाल्मीक सरतापे, गिरीश पांडुरंग कुलकर्णी, शिवाजी भानुदास सावंत, विठ्ठल बाबा म्हेत्रे, चंद्रकांत भगवान आडत, उमेश दत्तात्रय बनकर, जगन्नाथ शिवराम गायकवाड, नेहरू बाबा मदने, सुखदेव जगू साठे यांच्यासह ज्ञात-अज्ञात नेत्यांनी चांगले काम केलेले असल्याने श्री अर्धनारी नटेश्वर शेतकरी विकास पॅनलने दणदणीत व दैदिप्यमान विजय मिळविलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng