अमृत महोत्सवी फळझाडे वृक्ष, फुलपीके, मसाल्याची पिके, औषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेचा प्रारंभ – सतीश कचरे, मंडल कृषी अधिकारी, नातेपुते

नातेपुते (बारामती झटका)

आपला भारत देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्या प्रित्यर्थ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत द्रारिद्रय उच्चाटन, निसर्ग समतोल, रोजगार निर्मिती, निर्यातीस चालना व परकीय चलन मिळविणे व एकात्मिक शेतीचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांचे सलग शेतावर, शेतीच्या वैयक्तिक बांधावर व पडीक जमिनीवर सर्व प्रकारची फळझाडे, फुलपिके, मसाल्यांची पिके, औषधी व सुंगधी वनस्पती वृक्ष लागवड ग्रामपंचायत, कृषि व फलोत्पादन विभाग, सामाजिक वनीकरण, रेशीम विभाग यांचे संयुक्त सहकार्याने जॉबकार्ड धारकांना १०० दिवस प्राधान्याने काम पुरविण्यासाठी ही योजना ग्रामपंचायत कार्यक्षेतात राबविण्यात येणार आहे.

योजनेचे लाभार्थी – ०.०५ हे ते २ हे. पर्यंत क्षेत्र असलेले अनु. जमाती, अनु. जाती, भटक्या जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील लाभार्थी कुटुंब, स्त्री प्रमुख कुटूंब, दिव्यांग व्यक्ती व कुटूंब, जमीन सुधारणा लाभार्थी, पंतप्रधान आवास लाभार्थी, वनपट्टा धारक आदिवासी यांना प्राधान्य व कृषी कर्ज माफी अत्यल्प अल्प भुधारक लाभार्थी, कुळकायदा अंतर्गत ७/१२ वर कुळाचे नाव लाभार्थी यांचा द्वितीय प्राधान्यांने २ हे. क्षेत्र पर्यंत मर्यादा असलेले सर्व प्रकारचे वैद्य जॉब कार्ड धारक लाभार्थींचा या योजनेत समावेश आहे.

ग्रामपंचायत कार्य व जबाबदाऱ्या – १ – या योजनेची दवंडी देणे व्हॉटस ग्रुप व सोशल मिडीयातून प्रचार व प्रसिद्धी करणे. २ – २४x७ याप्रमाणे अर्ज स्वीकृतीसाठी ग्रमपंचायत, अंगणवाडी, शाळा, समाजमंदीर येथे अर्ज पेटी उपलब्ध करून देणे. ३ – डाटा इंन्ट्री सहायक तंत्र सहायक यांचे मदतीने ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेणे. ४ – १५ जुलै ते ३० नोव्हेंबर कालावधीमधील अर्ज येणाऱ्या प्रत्येक जवळच्या ग्रामसभेत ठेवून मंजूर करून घेणे. ५ – मंजूर अर्जाचे लेबर बजेट मध्ये समाविष्ट करून आराखडा बनविने. ६ – १ डिसेंबर ते १४ जुलै अर्जाचा समावेश पुरक बजेट करावा व ग्रामसभा मंजूर नंतर पंचायत समितीसाठी पाठवून मंजूरी घेणे इत्यादी महत्वाची कार्य व जबाबदारी ग्रामपंचायतने पार पाडावयाची आहे.

समाविष्ट पिके – केळी, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट या नव्याने समाविष्ठ पिकासह सर्व फळपिके, गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा इत्यादी फुलझाडे, सर्व प्रकारच्या औषधी व सुंगधी वनस्पती, लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ ही मसाल्याची पिके यांचा १ जून ते ३१ डिसेंबर पर्यंत लागवडीस प्राधान्यप्रमाणे समावेश आहे.

योजनेच्या अटी – सर्व गावातील एकूण जमिन २ हे. पर्यंत क्षेत्र मर्यादा असलेले ऑनलाईन वैद्य जॉबकार्डसह ग्रामसभेने मंजूर व मान्यता दिलेले लेबर बजेटमध्ये समाविष्ट कामासह द्वितीय वर्षी ९०% व तृतीय वर्षी ८०% रोपे जिवंत ठेवणारे लाभार्थी यास पात्र राहतील. तरी वरील अटी निकष लाभ यांचा विचार करता महाराष्ट्र जलकल्याण योजनाचा लाभ इच्छूकांनी घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या नजीकचे कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. प्रज्योत तुपे आणि चि.सौ.कां. शिवानी वाघ यांचा शुभमंगल विवाह सोहळा.
Next articleमाळशिरसकरांना कोणत्याही संकटात आठवतोय “राम”, मात्र रावण प्रवृत्तीची होतेय घालमेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here