अर्धनारीनटेश्वर महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय – संग्रामसिंह मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, सूर्यकांतदादा माने देशमुख यांचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रयत्न होते. ते प्रयत्न आता साकार झाले असून येत्या वर्षभरात या महाविद्यालयाचे बांधकाम पूर्ण होइल, असा विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर महाविद्यालयाच्या नविन शैक्षणीक संकुलाचा भूमीपुजन समारंभ मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. वेळापूरातील अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय व सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयासाठी हे नवीन शैक्षणीक संकुल निर्माण होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखान्याचे संचालक शंकरराव माने-देशमुख हे होते.

यावेळी बोलताना अर्धनारीनटेश्वर महाविद्यालयाचे सभापती अमरसिंह माने-देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विद्यार्थ्याना अद्यावत शैक्षणिक संकुल असावे असा मानस होता. त्यादृष्टीने विजयदादा व बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक संकुलाचे भूमीपुजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे संग्रामसिह मोहिते पाटील यांचा सत्कार अमरसिंह माने-देशमुख यांनी केला.

या सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती सतिशराव माने-देशमुख, महादेव देवालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव माने देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष दळवी, वसंत जाधव, रामचंद्र गायकवाड, महादेव देवालय देवस्थानचे विश्वस्त पांडुरंगभाऊ माने देशमुख, वेळापूर विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन महादेव ताटे, माजी सरपंच हनुमंत साळुंखे, शंकर काकुळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय माने, विरकुमार दोशी, डॉ. हनुमंत आवताडे, अशोक साबळे, चंद्रकांत आडत, तुकाराम जगदाळे, अमोल व्होरा, चंद्रकांत क्षीरसागर, रणजित माने देशमुख, अस्लम शेख, शंकर माने, मुख्याध्यापक सुरेश साळुंखे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थीत होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रविंद्र माने यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. आशा गायकवाड यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोरोची विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न…
Next articleचिरंजीव अरुण व चि. सौ. का. मेघा यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ स्वागत समारंभ व प्रीती भोजनाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here