सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पोलीस स्टेशनने कामगिरी बजावली.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हेर येथील शितल वय वर्ष 12 या कन्येचा बालविवाह रोखण्यामध्ये माळशिरस पोलीस स्टेशन यशस्वी झालेले आहेत.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी जिल्ह्याच्या हद्दीत बालविवाह प्रतिबंधक मोहिमेस सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मतराव जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली व माळशिरस पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्यामध्ये माळशिरस पोलीस स्टेशन मधील पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे.
गुरुवार दि. 9/5/2022 रोजी माळशिरस पोलीस ठाण्यास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बालविवाह प्रतिबंधक कारवाईची मोहीम केलेली आहे. कन्हेर ता. माळशिरस येथील शितल वय वर्ष 12 चे नाव बदलून कन्हेर येथे 11/6/2022 रोजी विवाह होणार आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी रवाना केले.

सदर ठिकाणी पोलीस अंमलदार यांनी चौकशी केली असता कन्हेर येथील शितल वय वर्ष 12 शिक्षण इ. सातवी बदललेले नाव हिचा विवाह 19 वर्षीय रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा याच्या सोबत होत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने शितल हिचे कडे महिला पोलिसांमार्फत चौकशी केली असता बालिकेच्या आई-वडिलांकडे चौकशी करून सदर बालिकेचा बालविवाह करण्यात येत असल्याची खात्री झाल्याने सदर बालिकेस जिल्हा महिला व बाल संरक्षण समिती सोलापूर यांचे समक्ष पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांचे मार्फत हजर केले.

सदरची कारवाई माळशिरस पोलीस ठाणे कडील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक राजेंद्र चौगुले, महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री जगताप, चालक पोलीस कॉन्स्टेबल गजानन माने यांचे पथकाने पूर्ण केली. एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह होण्यापासून तसेच तिचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून माळशिरस पोलीस स्टेशन यांनी थांबवलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng