अवैध वाळू साठ्याकडे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची जाणीवपूर्वक डोळेझाक जनतेचा आरोप.

प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख वाळू साठ्याचे स्टिंग ऑपरेशन करतील का ? जनतेचा सवाल.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात वाळू तस्कर व वाळूचा व्यवसाय करणारे यांनी आपल्या घरासमोर शेतातील विहिरीजवळ व मोकळ्या जागेत अवैद्य वाळूचे उत्खनन करून शासनाचा महसूल चुकवून अवैद्य वाळू साठे केलेले आहेत याविषयी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्याकडे साठ्या याविषयी माहिती दिली असता जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे नुतन प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख डॉक्टर असल्यामुळे वाळू साठ्याचे स्टिंग ऑपरेशन करतील का ? असा थेट जनतेतून सवाल होत आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये अवैद्य वाळू व्यवसाय स्थानिक महसूल चे कर्मचारी तलाठी व मंडलाधिकारी यांच्या दुर्लक्ष पणामुळे व पोलिस प्रशासनाच्या वरदहस्ताने सुरु आहे. तालुक्यातील नदी, ओढे, नाले तलाव ,पाझर टॅंक या ठिकाणी पाण्यासोबत आलेली वाळू बेकायदेशीर शासनाचा महसूल बुडवून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी कारवाई करू नये यासाठी त्यांचे हात ओले करून वाळू तस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करीत असतात असा समज जनतेमधून झालेला आहे कारण अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई न केल्यामुळे झालेला आहे. काही वाळूतस्करांनी व वाळू व्यवसायिकांनी ओढे-नाले नदी तलाव या ठिकाणी असणाऱ्या गावातील शेतात घराशेजारी किंवा मोकळ्या जागेत अवैद्य वाळूचे उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू साठे केलेली आहे सदरच्या साठे विषयी तहसीलदार यांना जनतेने माहिती दिली तरीसुद्धा सदरच्या वाळू साठ्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जात आहे असा जनतेतून सवाल उपस्थित होत आहे. तहसिलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे यामध्ये नागरिकांच्या मनामध्ये अनेक शंका-कुशंका उपस्थित होत आहेत. यासाठी प्रशासनामध्ये वचक असणारे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी डॉ् विजय देशमुख हे डॉक्टर असल्यामुळे अवैध वाळू साठ्याचे स्टिंग ऑपरेशन करतील का ? असा जनतेतून सवाल उपस्थित केला जात आहे. अवैद्य वाळू उत्खनन व अवैद्य वाळू साठा याविषयी स्थानिक लोकांना बेकायदेशीर उत्खननाची माहिती देण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी टोल फ्री नंबर जाहीर करावा त्या नंबर वर स्थानिक नागरिक संपर्क करून अवैद्य वाळू उत्खननाची माहिती देतील असेही जनतेमधून बोलले जात आहे. तालुक्यातील स्थानिक पोलिस स्टेशन यांच्यापेक्षा सोलापूर ग्रामीण च्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या भरारी पथकाने मोठ्या कारवाया केल्या आहे त्याप्रमाणे तालुक्यांमध्ये दोन भरारी पथके तयार करून पोलीस प्रशासनाची साथ घेतल्यास अवैद्य व्यावसायिकांचा समूळ नाश होईल असा नागरिकांचा सल्ला उपस्थित केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी गावच्या सरपंचपदी विष्णूभाऊ गोरड यांची सर्वानुमते निवड.
Next articleमाढा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आ. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत दाखल्याच्या सेतू कार्यालयात कॅम्प संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here