श्रीपूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शिफारशीनुसार माळशिरस तालुका शिवसेना उपप्रमुख नितीन विश्वंभर वाघमारे यांची माळशिरस तालुका अवैध दारू प्रतिबंधात्मक तालुका स्तरीय समिती सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. नितीन वाघमारे हे शिवसेनेचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. अतिशय धाडसी, आक्रमक चेहरा असलेले वाघमारे यांनी स्वर्गीय लोकनेते दत्ता वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक म्हणून श्रीपूर भागात काम सुरू केले.
सतत सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. अन्याय, अत्याचार किंवा विशिष्ट प्रकारच्या दहशती विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांची शासकीय पातळीवरून सदस्य म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या माध्यमातून गावासाठी निश्चित चांगले काम करु. आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या सहकार्याने गावासाठी, गावाच्या विकासासाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मोठा विकासनिधी उपलब्ध करुन काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहिन. कुठलाही पक्ष गटबाजी किंवा स्थानिक राजकारण न करता सर्वांनी पाठिंबा, सहकार्य केले तर अनेक विकासकामे करण्यासाठी भरीव निधी आणता येईल.

पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, या परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करून युवा पिढीला चांगल्या प्रवाहात कसं आणता येईल, तसेच त्यांना रोजगाराच्या संधी व्यापार धंदा करण्यासाठी शासकीय पातळीवरून समाजकल्याण अधिकारी यांच्या सहकार्याने बेरोजगार मेळावा, रोजगार धंदा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे, याची माहिती देण्यासाठी दर महिन्याला मेळावा घेऊन समुपदेशन कार्यक्रम घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. वाघमारे यांनी शिवसेनेच्यावतीने महाळुंग श्रीपूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. गावाच्या विकासासाठी चांगलं काम करुन दाखवणार अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng