वाघोली (बारामती झटका)
पंचायत समिती, माळशिरस येथे पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ सहायक श्री. अशोक भानुदास खुडे हे नियमित वयोमानानुसार दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त पंचायत समिती माळशिरस येथील पाणी पुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पंचायत समिती माळशिरस, जिल्हा परिषद उप विभाग माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती माळशिरस च्या माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, सहायक गट विकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्याहस्ते सपत्नीक सत्कार पंचायत समिती माळशिरस येथे करण्यात आला.
यावेळी अशोक खुडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पंचायत समितीत एकूण बत्तीस वर्ष दोन दिवस नोकरी केली असून त्यांनी केलेल्या नोकरीचा अनुभव सांगितला. तसेच प्रमुख पाहुणे वैष्णवीदेवी मोहिते पाटील, श्रीकांत खरात यांनी खुडे यांना एक निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य सुखाचे व आनंदाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या. सदर वेळी भूमकर, कुलकर्णी, राजेंद्र मिसाळ, चंद्रकांत कुंभार यांनीही आपले मनोगत व्यक्त करून खुडे यांना शुभेच्छा दिल्या.
सदर वेळी कृष्णात बाबर, एम. आर. बुगड, बी. एच. कदम, एस. व्हि. गिराम, ए. एम. ठोकळे, एस. एस. बागल तसेच पंचायत समितीच्या सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्र संचालन व आभार आर. डी. राऊत यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng