शाखा अभियंता, उपअभियंता कार्यकारी अभियंता यांना डोके आहे ? का नाही ? ठेकेदाराचे सुद्धा डोके फिरले वाटते…
सदाशिवनगर ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालवा या कालव्यावरील 52 क्रमांकाचा उपफाटा आहे. सदाशिवनगर येथील राऊत वस्ती व सालगुडे पाटील वस्ती या ठिकाणी पूल बांधलेला सदरचा पूल पाहिल्यानंतर ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झालेली आहे. शाखा अभियंता उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना डोके आहे ? का नाही ?, असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला असून ठेकेदाराचे सुद्धा डोके फिरलेले वाटत आहे. असा पूल पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांसह येणाजाणाऱ्याला सुद्धा वाटत आहे.
सदाशिवनगर येथील राऊत वस्ती व सालगुडे पाटील वस्ती या ठिकाणी 52 फाट्यावर स्थानिक नागरिकांना व वाड्या-वस्त्यावर जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, दूध वाहतूक करणाऱ्या मोटरसायकली, चार चाकी गाड्या, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण यांना फाटा पार करण्याकरता सोयीस्कर व्हावे. फाट्याला पाणी आल्यानंतर अथवा कॅनॉलमध्ये चढ-उतार करण्यापेक्षा पुलाची निर्मिती जनतेच्या मागणीवरून हितासाठी केलेली आहे. पूर्वी पूल नसल्याने अडचण होती, आत्ता पूल बांधूनसुद्धा मोठी अडचण झालेली आहे. त्यामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था फाट्यावरील पुल पाहिल्यानंतर प्रचिती येते. शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांना डोके आहे का नाही, ठेकेदाराचे सुद्धा डोके फिरलेले आहे. असे वाटत आहे. कारण पुलाची उंची साईड पट्टी याच्यावर चार ते पाच फूट आहे. लहान मुले व वृद्ध माणसांनी पुलावर चढणे जिकिरीचे होणार आहे यासाठी त्यांना कसरत करावी लागेल. वेळप्रसंगी शरीरातील अवयव निकामी किंवा प्राणाला मुकावे लागेल, अशी अवस्था पुलाची झालेली आहे. जमिनीपासून चार ते पाच फुट उंच फुलावर चढायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे निरा उजवा कालवा विभागाचे डोके ठिकाणावर आणून पुलाची उंची कमी करावी, साईट पट्ट्या भरून चालणार नाही, दोन्ही बाजूला तीव्र उतार होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आणण्याकरता जलसंपदामंत्री नामदार जयंतराव पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिक धाव घेऊन न्याय मागणार असल्याचे त्रस्त जनतेमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng