अहो, भाऊसाहेब.. काल काय वाचलंय, ऐकलंय ते खरं हाय का ?

सरपंचसाहेब.. आपल्या काळात रस्त्याच्या बिलाचा घोटाळा नाही, मात्र घरकुल, गायगोठा यांची फक्त नाव खालीवर करण्यात घोटाळा झाला.

माळशिरस (बारामती झटका )

“आता माझी सटकली… ” म्हणण्याची वेळ विद्यमान सरपंचावर आली आहे. माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने रस्ता न करताच शाखा अभियंत्याच्या सहकार्याने बिल काढले. गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, उपअभियंता यांच्यावरही सरपंच व ग्रामसेवक यांच्यासह कारवाई करण्याची गरज आहे, अशी बातमी बारामती झटका वेब पोर्टलवर प्रसारित झाल्यानंतर सरपंच, सरपंचांचे पती, दिर, चिरंजीव यांचे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना फोनाफोनी सुरू झाली. अहो, भाऊसाहेब काल काय वाचलंय, ऐकलंय ते खरं हाय का ? ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंचांना व नातेवाईकांना फोनवर सांगितले की, आपल्या काळात रस्ता न होता रस्त्याचे बिल काढण्याचा घोटाळा झाला नाही. मात्र, घरकुल व गायगोठा व इतर लाभार्थ्यांची यादी फक्त खालीवर करण्यात घोटाळा झाला आहे असे एकमेकांना फोन खणखणू लागले. यांच्या फोनाफोनीचे आवाज जनतेच्या कानोकानी येऊ लागले.

सरपंचसाहेब आपण मोठमोठ्या, चांगल्या गावात काम केलेले आहे. अजून त्या गावातील लोक माझे नाव काढतात. रस्ता न करता कधी बिल काढले असे गैरप्रकार केले नाही मात्र, पहिल्या भाऊसाहेबांकडून असा प्रकार झालेला आहे अशी सदस्य व ग्रामस्थांमधून चर्चा आहे. आपल्या काळात फक्त घरकुलाची यादी, गायगोठा, सिंचन विहीर, इतर व्यक्तिगत लाभार्थी या लाभार्थ्यांच्या याद्या तेवढ्या सरपंच साहेब तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून खाली वर नाव केलेली आहेत, एवढाच आमचा दोष आहे. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते, चळवळीचे नेते, माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी जर उकरून काढलं तरच अडचण, बघु जवाचे तवा… सध्यातरी घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा भाऊसाहेब यांचेकडून सरपंच व नातेवाईक यांना दिला जात असल्याची खुमासदार चर्चा रंगलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे तीन लाख में. टन ऊस गाळप पूर्ण.
Next articleराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांची परिसंवाद यात्रा माळशिरस तालुका दौरा जाहीर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here