आई-वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – ह.भ.प. गणेश महाराज भगत

कै. लक्ष्मणतात्या भांड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील घनश्याम लक्ष्मण भांड, ॲड. धनंजय लक्ष्मण भांड, यांचे वडील कै. लक्ष्मणतात्या नागनाथ भांड यांचे प्रथम पुण्यस्मरण दि. १३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. या निमित्ताने ह.भ.प. गणेश महाराज भगत यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.

‘सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठी विठोबाचे’, हा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतला होता. सार आणि असार काय आहे तसेच विचार, नरदेहाचे महत्व, भागवत कथेतील दृष्टांत, भोग, त्याग, सुखदुःख, नामस्मरण, सेवाभाव, पुण्यस्मरणाचे महत्त्व अशा विविध अंगाने कीर्तनामध्ये निरुपण करून महाराजांनी पुढे आई वडिलांचे किती उपकार आपल्यावर आहेत, हे सांगून सध्या काळाची गरज आहे, ती म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे, असे सांगितले. आई वडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे, याचे महत्व अनेक उदाहरणे देत समोरील भाविक श्रोत्यांना त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून मंत्रमुग्ध केले.

कै. लक्ष्मणतात्या हे नातेपुते गावचे माजी सरपंच स्व. रामचंद्र दादा भांड व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रशेखर भांड व स्व. हनुमंतराव भांड यांचे ते बंधू होते. त्यांनी गेल्यावर्षी वयाच्या ८० व्या वर्षी देह ठेवला. नातेपुते परिसरासह भांड परिवाराचे सर्व क्षेत्रांमध्ये संबंध असल्याने या कार्यक्रमास पाहुणेमंडळी, नातेवाईक, मित्रपरिवारासह सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी दु. १२:०५ वा. पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर आरती, पसायदान घेऊन महाप्रसाद होऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउस वाहतुक करताना सावधानता बाळगा…
Next article… अखेर शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जमीन विक्री लिलाव दहा कोटी दहा लाख रुपयाचा झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here