आई-वडिलांनी अहोरात्र काबाडकष्ट करून तुम्हाला शिक्षणात घडवलं वाममार्गाने वागून कष्ट मातीमोल करू नका.

सावधान : लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या संगनमताने बेकायदेशीर कामे टाळून भविष्यातील धोका टाळा.

ग्रामसेवक, शाखा अभियंता, कृषी सहाय्यक यांनी मोहाला बळी न पडता आई-वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावे असे काम करावे.

माळशिरस ( बारामती झटका )

ग्रामीण भागात गरीब परिस्थिती अशा कठीण प्रसंगी आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र काबाडकष्ट करून मुलांचे शिक्षण, भवितव्य घडवीत असतात. काही वेळेला नोकरीत काम असताना वाम मार्गाने आर्थिक हितसंबंध व पैशाच्या मोहापोटी बेकायदेशीर कामे केलेली असल्याने नोकरीतून बडतर्फ किंवा शास्त्ती लागते‌. अशावेळी आई-वडिलांनी अहोरात्र केलेल्या कष्टाचे माती मोल होते. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तलाठी मंडल अधिकारी यांनी लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या संगनमताने बेकायदेशीर कामे करण्याचे टाळून भविष्यातील धोका टाळावा. कर्मचारी आणि अधिकारी यांनी मोहाला बळी न पडता आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याकरता प्रामाणिकपणे सद्सद्विवेक बुद्धीला पटेल अशीच कामे करून जनमाणसात आपली प्रतिमा उंचवावीली, अशी अशिक्षित आईवडिलांची अपेक्षा असते.

प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी प्रामाणिकपणे काम करून समाजामध्ये आपली प्रतिष्ठा उंचावत असतात. अशा कर्मचारी व अधिकारी यांचा समाजामध्ये वेगळा ठसा निर्माण होतो. याचा अभिमान आई-वडिलांना सुद्धा असतो मात्र, काही कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट व वाममार्गाने लक्ष्मी मिळवण्याच्या नादात अवदसा डोक्यात घालून घेतात आणि अनेक वेळा समाजामध्ये मानहानी व प्रतिष्ठा धुळीला मिळालेली आपण पाहत असतो. त्यासाठी कर्मचारी व अधिकारी यांनी प्रामाणिकपणे व सद्सद्विवेकबुद्धीला पटेल अशीच कामे करणे गरजेचे आहे. काही वेळेला लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या आमिषाला बळी पडून बेकायदेशीर कामे केली जातात.

सदर बेकायदेशीर कामे कागदपत्रावर कायमस्वरूपी राहत असतात. त्यामुळे भविष्यात अडचणी उद्भवत असतात. माहिती अधिकार कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक यांच्या माध्यमातून अशा गैरप्रकारावर आवाज उठविल्यानंतर अडचणी निर्माण होतात. वेळप्रसंगी नोकरीस मुकावे लागते. अशावेळी आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे मातीमोल होते. यासाठी कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्यास भविष्यात काहीच अडचणी येत नाहीत. समाजामध्ये म्हण प्रचलित आहे, जो विळा गिळेल, त्याच्या … मध्ये अडकेल, असे बोलले जाते. त्यामुळे सावधान… ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक, तलाठी, मंडल अधिकारी यांनी उत्कृष्ट व चांगले काम करून समाजामध्ये आपली व आई-वडिलांची प्रतिष्ठा वाढवावी असे बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची श्रीनाथ मंदिरास सदिच्छा भेट.
Next articleचि. बिभीषण व चि.सौ.कां. माधुरी एकाच रेशीमगाठीत बांधले जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here