आजपर्यंत जाईन तिथं राजू शेट्टींचा मुलगा म्हणून मान मिळाला, तो टिकवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन – सौरभ शेट्टी

सौरभ शेट्टी यांनी आई-वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा…

मुंबई (बारामती झटका)

आज तुमच्या लग्नाला 29 वर्षे झाली. या 29 वर्षामध्ये चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना तुम्ही दोघांनी अनेक संकट झेलली. गल्लीतल्या शिवारापासून ते दिल्लीतल्या संसदेपर्यंत आयुष्यातील खडतर प्रवास हा एकमेकांच्या साक्षीने झाला. गेल्या 29 वर्षात अनेक जबाबदाऱ्या तुम्ही खांद्यावर घेतल्या. मी तेव्हा लहान होतो, पण नक्कीच आज तुमच्या विचारांचा पाईक होऊन चळवळीमध्ये छोटे-मोठे काम करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळते आणि गेली अनेक वर्ष तुम्ही कष्टातून मला शिकवलं, मला मोठे केलं.

घरात सर्व भावभावात सर्वात लहान असून पण साहेबांनी अनेकांच्या शिक्षणाची आणि राहणीमानाची जबाबदारी आपल्यावर खांद्यावर घेतली. तुमच्या याच शिकवणीतून या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो या विचारातून वयाच्या 23 व्या वर्षी समाजातील गरजू दोन विद्यार्थ्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेऊ शकलो, हा एक तुमच्या संस्कारातील मोठा भाग आहे.

इथुन पुढच्या काळात तुमच्या जबाबदाऱ्यांचे ओझं माझ्या खांद्यावर घेण्यासारखी ताकद माझ्या अंगी यावी आणि तुम्ही दोघांनी केलेल्या कष्टाला न्याय मिळावा त्याकरता माझा एक छोटा प्रयत्न म्हणून नक्कीच मी काही ना काही तरी प्रयत्न करत राहीन. आजपर्यंत जाईन तिथं राजू शेट्टींचा मुलगा म्हणून मान मिळाला, तो टिकवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. भविष्यातील माझ्या वाटचालीने तुमची मान किती उंचावेल हे माहित नाही, पण माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागणार नाही, एवढा विश्वास तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर तुमच्या माझ्याकडून असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेन असा विश्वास देतो. आई बाबा तुम्हा दोघांनाही 29 व्या लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचा सौरभ!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थान प्रमुख श्री. बाळासाहेब चोपदार यांची पालखी महामार्गाला सदिच्छा भेट.
Next articleस्व. कोंडीबा बिरा गोरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. नंदकुमार महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here