पुणे (बारामती झटका)
आजादी का अमृत महोत्सव-७५ स्वातंत्रदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र शासनाच्या विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार व उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांचे एक दिवशीय संमेलन २४ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. शिरनामे सभागृह, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी. रेंदाळकर,यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादींना आमंत्रित करण्यात येत आहे. तरी या संमेलनात संबंधितानी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. रेंदाळकर यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng