आजोबांचा गावकी व्यवसाय नातवांनी आधुनिक युगात अभिनव स्टाईलने सुरू केला…

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते व माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न

पानीवकर पाटील परिवार यांचे गावातील प्रामाणिक व निष्ठावान लोकांना गावाच्या बाहेरसुद्धा उद्योग व्यवसायानिमित्त पाठबळ

माळशिरस ( बारामती झटका )

पानीव ता. माळशिरस हद्दीतील घुले नगर येथील स्व. भगवान क्षीरसागर यांनी पूर्वीच्या काळी आपला पारंपारिक गावकी व्यवसाय करून उदरनिर्वाह व प्रपंच केला. तोच व्यवसाय मुलगा गोरख क्षीरसागर यांनी थोडासा बदल करून माळशिरस येथे एसटी स्टँड परिसरात अभिनव हेअर स्टाईल दुकान सुरू केले होते. त्यांचा नातू सुनील व नातसून प्रीती यांनी आधुनिक युगातील बदलत्या काळानुसार अद्यावत असे अभिनव हेअर स्टाईल व ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आजोबांचा पारंपारिक गावकी असणारा व्यवसाय त्यामध्ये अमुलाग्र बदल करून बदलत्या काळानुसार आधुनिक युगातील अद्यावत हेअर स्टाईल शोरूम सुरू केलेले आहे.

अभिनव हेअर सलून व ब्युटी पार्लरचा शुभारंभ माळशिरस येथे अकलूज रोड ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवार दि. 11 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते व माळशिरस नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगरसेवक डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यामध्ये लोकप्रिय आमदार राम सातपुते, कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाशराव पाटील, माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नगरसेवक आजिनाथ वळकुंदे, कैलास वामन, सौ. रेश्माताई टेळे, माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासो देशमुख, अहिल्यादेवी विकास संस्थेचे चेअरमन संदीप पाटील, कचरेवाडीचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच नवनाथ कचरे, तिरवंडीचे विद्यमान सरपंच नानासाहेब वाघमोडे सर, कचरेवाडीचे सरपंच हनुमंतराव सरगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अभिनव हेअर सलूनचे उद्घाटन लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते झाले तर अभिनव ब्युटी पार्लरचे उद्घाटन कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांच्या शुभहस्ते संपन्न झालेले होते. यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत श्री. गोरख भगवान क्षीरसागर, सौ. पूजा गोरख क्षीरसागर, श्री. सुनील गोरख क्षीरसागर, सौ. प्रीती सुनील क्षीरसागर, चिरंजीव शुभम गोरख क्षीरसागर, श्रीमती सुमन भगवान क्षीरसागर यांच्यावतीने उपस्थितांचा मानसन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक एन. डी. पाटील यांनी केलेले होते.

माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या व श्रीराम शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. श्रीलेखा पाटील व युवा नेते करण पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा देऊन पाणीवकर पाटील यांनी क्षीरसागर परिवार यांच्या पाठीशी गावामध्ये आणि गावाबाहेर व्यवसायानिमित्त गेले तरी सुद्धा प्रामाणिक व निष्ठावान लोकांना आशीर्वादाचे पाठबळ कायम ठेवले आहे.

भागवत क्षीरसागर व सुमन क्षीरसागर यांनी व्यवसायानिमित्त पानीव हद्दीतील गोपनेवस्ती-गुरववस्ती येथे वास्तव्यास राहून पूर्वीचा पारंपारिक गावकी करण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. जमीन, घर, जागा काहीच नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत गावकी करून उदरनिर्वाह व प्रपंच सुरू होता. पूर्वीच्या पारंपारिक व्यवसायामध्ये हळूहळू बदल होत जाऊन मुलगा गोरख क्षीरसागर यांनी 1991 साली अभिनव हेअर स्टाईल एसटी स्टँड परिसरात सुरू करून आपला पारंपारिक व्यवसाय सुरू केला. गोरख यांनी प्रतिकूल परिस्थितीत व्यवसाय केला. त्यांना बरड येथील काशीद घराण्यातील पूजा या धर्मपत्नीची चांगली साथ मिळाली. प्रपंच करीत असताना त्यांनी पानीव घुलेनगर येथे 2000 साली एक एकर शेती खरेदी केली. 2013 साली भगवान क्षीरसागर यांचे दुःखद निधन झालेले आहे. सौ. पूजा व श्री. गोरख यांना सुनील व शुभम अशी दोन मुले. दोन्हीही मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. सुनील यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे तर, शुभम यांनी बी. फार्मसी पूर्ण केलेले आहे. दोघांनीही शिक्षण घेऊन नोकरी न करता आपल्या वाडवडिलांचा पारंपारिक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुनील यांनी तामसिदवाडी येथील राऊत घराण्यातील सौ. प्रीती यांच्याशी विवाह केलेला आहे. प्रीती सुद्धा शिक्षित आहेत. त्यामुळे सुनील व प्रीती या पती-पत्नीने माळशिरस शहरात पारंपरिक व्यवसायामध्ये आधुनिक व अद्यावत मशनरीच्या साह्याने व्यवसाय करण्याचा शुभारंभ केलेला आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये हेअर स्टाईल व ब्युटी पार्लर एकाच ठिकाणी उपलब्ध असते. असेच शोरूम माळशिरस शहरात सुरू केलेले आहे. शुभम यांनी बी. फार्मसी केलेले असल्याने होलसेल औषधाबरोबर कॉस्मेटिक साहित्य ठेवून परिसरातील आपल्या बांधवांना माफक दरामध्ये व्यवसाय करण्याकरता साहित्य उपलब्ध करून देण्याचाही त्यांचा मानस आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleThe Talismans and Totems Business
Next articleचि. प्रसाद ढवळे आणि चि.सौ.कां. किरण काळे यांचा शुभविवाह सोहळा होणार संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here