आज लवंग 25/4 येथे कृषीकट्टा शाश्वत शेती कृषी केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

लवंग (बारामती झटका)

लवंगचे युवा शेतकरी हनुमंत वाघ व दत्तात्रय चव्हाण यांनी चालू केलेल्या कृषी कट्टा या कृषी केंद्राचे उद्धघाटक वैश्विक फुड्स कंपनी चे विकास दांगट तर प्रमुख पाहुणे महा ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनी चे दिलीपरावजी देशमुख हे होते
लवंग गावातील शेतकरी वर्ग, प्रतिष्ठित नागरिक व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख उद्धघटक यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले ,कि इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी शास्वत उत्पादनासाठी करार शेतीकडे वळले पाहिजे तरच शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या उभा राहील… कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले आजचा शेतकरी हा आधुनिक शेतीकडे वळाला आहे, परंतु यामध्ये रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर करीत आहे त्यामुळे शेतीचे आरोग्य ढासळत चालले आहे.पुढच्या काळात शेती जिवंत ठेवायची असेल तर सेंद्रीय व जैविक शेती कडे शेतकरी वळला पाहिजे, त्यासाठी शेतकर्‍यांनी जैविक शेती व सेंद्रिय शेती कशी करावी याचा आधी अभ्यास केला पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होईल अलीकडच्या काळात मानवी शरीरावर वाढते रोगांचा प्रादुर्भाव याला कारणीभूत रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर आहे आधुनिक काळातील शेती करताना आपल्या पूर्वजांनी केलेली पारंपरिक शेती याचाही युवकांनी अभ्यास केला पाहिजे पूर्वजांनी आपल्या हातात जिवंत शेती दिली आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ही शेती जिवंतच द्यायची आहे हे आजच्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे.

कार्यक्रमाची प्रस्तावना निलेश घरमाळकर यांनी केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लवंगचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकृषि विभागाच्या विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा तालुका कृषि अधिकारी – सौ. पुनम चव्हाण.
Next articleवाफेगावमध्ये समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here