“आता माझी सटकली…” म्हणण्याची वेळ विद्यमान सरपंचावर आली…

माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने रस्ता न करताच शाखा अभियंत्याच्या सहकाऱ्यांनी बिल काढले.

गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, कक्ष अधिकारी, उप अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची गरज.

माळशिरस ( बारामती झटका )

केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांनी थेट ग्रामपंचायतीला निधी देऊन ग्रामीण भागाचा विकास व्हावा, निधीचा विनियोग चांगला होऊन भ्रष्टाचार होणार नाही हा उद्देश. मात्र, अति हुशार सरपंच व भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांनी रस्त्याचे काम न करता शाखा अभियंता यांच्या सहकार्याने बिल काढले असल्याचा धक्कादायक प्रकार विद्यमान सरपंच यांच्या समोर आलेला असल्याने विद्यमान सरपंच यांच्यावर “आता माझी सटकली…” म्हणण्याची वेळ आलेली आहे.

कानात आणि डोळ्यात चार बोटाचे अंतर आहे. ऐकण्यापेक्षा कागदपत्रांची खात्री करण्याचे काम सुरू आहे. जर असा प्रकार घडला असेल तर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, उप अभियंता, जिल्हा परिषद उपविभाग यांनाही अति हुशार सरपंच व भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांच्यासमवेत दोषी ठरवून प्रशासकीय कारवाई करणे गरजेचे आहे.

ग्रामपंचायत स्तरावर 14 वा वित्त आयोग व नवबौद्ध घटकातील विकास करण्याकरता दलित वस्ती व इतर निधीची विकास कामे ग्रामपंचायत मार्फत केली जात असतात. अशा वेळी ग्रामपंचायत स्तरावर सदर कामाचे ई-टेंडरिंग केले जाते. ई-टेंडरिंग करीत असताना अनियमितता होत असते, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, काम न करता बिल काढणे हा मात्र भ्रष्टाचार करण्याकरता ठरवून केलेला आगाऊपणा आहे. अशावेळी लगाम घालने गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येत असतो. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर नियंत्रण व अडीअडचणी सोडविण्यासाठी विस्ताराधिकारी यांची नेमणूक केली जाते‌. महिन्याला ग्रामपंचायतींचा अहवाल गटविकास अधिकारी यांना दिला जातो. विस्तार अधिकारी यांची ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते मात्र, तसे घडत नाही. विस्ताराधिकारी, कक्ष अधिकारी, आणि गट विकास अधिकारी टक्केवारीचे धनी असतात. जर कोणत्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची तक्रार आली तर हेच विस्ताराधिकारी त्रीसमिती नेमून चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचे अहवाल गटविकास अधिकारी यांना देतात. गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून अनेक वेळा सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळलेले आपण पाहिले आहे. मात्र, विस्तार अधिकारी यांच्यावर ठेवला जात नाही. वास्तविक पाहता त्यांची संपूर्ण जबाबदारी नियंत्रण व मार्गदर्शनाची असते असे असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही.

ग्रामपंचायत कारभार करीत असताना अनेक ठिकाणी सरपंच यांचा मनमानी कारभार असतो. भ्रष्टाचारी ग्रामसेवक खतपाणी घालीत असतात. गावामध्ये दोन तीन वेगवेगळे गट असतात. प्रत्येक गटाला ग्रामसेवक यांचेकडून वेगवेगळे मार्गदर्शन होते त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सुसूत्रता राहत नाही. सरपंच व ग्रामसेवक यांची आर्थिक मिलीभगत झाल्यानंतर गावचा विकास होत नाही मात्र, भकास होतो. अशावेळी अंतर्गत केलेली अनियमित कामे चव्हाट्यावर येतात.

अशाच एका विद्यमान सरपंचाच्या गावामध्ये माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने रस्ता न करता शाखा अभियंता यांच्या सहकार्याने बिल काढलेले आहे. सदरची बिल विस्ताराधिकारी, कक्ष अधिकारी, गटविकास अधिकारी, उप अभियंता यांनी मंजूर करून पैसे काढलेले आहेत. याची खातरजमा करण्याकरता सरपंचांचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रकार आपल्या गावात झाले असतील तर संपूर्ण माहिती व कागदपत्रासह बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी 98 50 10 49 14 या मोबाईल नंबरशी संपर्क साधून कागदपत्रे घेऊन समक्ष भेटावे आणि आपल्या गावातील भ्रष्टाचार उघड करावा. समाजामध्ये अनेक सरपंच ग्रामपंचायतीचा चहासुद्धा न पिणारे आहेत. कितीतरी ग्रामसेवक इमानेइतबारे काम करीत असतात. पगारावर समाधानी असतात. प्रशासन लोकाभिमुख चालून पुरस्कार मिळवणारे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी असतात. भ्रष्ट ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यामुळे गालबोट लागते. संपूर्ण भ्रष्टाचार करणारेच आहेत, असे नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांची कीड काढणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरपंचायतमध्ये कृष्णा, भिमा, निरा, राजकीय प्रवाह एकत्र आल्याने विकासाची गंगा वाहणार.
Next articleरांगोळीतून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here