धर्मपुरी ग्रामपंचायत मध्ये 14 वा वित्त आयोग अंतर्गत साहित्य खरेदीमध्ये झालेल्या अनियमितते वरून सरपंच पदावरून काढून टाकले.
धर्मपुरी ( बारामती झटका )
धर्मपुरी तालुका माळशिरस येथील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव काटकर यांना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी धर्मपुरी ग्रामपंचायत मध्ये 14 वा वित्त आयोग अंतर्गत साहित्य खरेदी मध्ये झालेल्या अनिमितते वरून सरपंच पदावरून सरपंच पदावरून काढून टाकण्यात आलेल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना दिलेला असून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशायीन शेळकंदे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांना पत्र देऊन कळविलेले असल्याने माळशिरस तालुक्यात खळबळ माजलेली आहे.
धर्मपुरी तालुका माळशिरस येथील प्रदीप महादेव झेंडे व नितीन नामदेव निगडे यांनी 14 वा वित्त आयोग अंतर्गत खरेदी केलेल्या एलईडी पथदिव्यांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रार केलेली होती या तक्रारी मध्ये तक्रारदार यांनी असे नमूद केलेले होते सरपंच व ग्रामसेवक यांनी सिस्का कंपनी चे 25 w 30 w एलईडी पथदिवे प्रति नग 5241 या किमतीला करून लक्ष्मी सेल्स एंटरप्राइजेस बारामती यांचे कडून खरेदी केलेले आहेत स्थानिक बाजारात सिस्का कंपनी चे 25 w 30 w एलईडी पथदिवे 1185 व 1260 इतक्या किमतीला मिळत आहेत. ओपन एलईडी पथदिव्यांच्या व इतर निविदा एकाच कंत्राटदाराने वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने भरल्या असून या कंपन्या पंचायत समिती माळशिरस कडे कार्यरत असलेले ग्रामसेवक यांच्या स्वकीयांच्या आहेत या व्यवहारांमध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे अतिरिक्त मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी एलईडी पथदिवे याच्या बाबतीत ठरवून दिलेल्या निकषांची पायमल्ली केलेली आहे पथदिवे यांचे वापरलेले साहित्य हलक्या प्रतीचे वापरलेले आहे लक्ष्मी सेल्स इंटरप्राईजेस बारामती या पुरवठा धारकाने खेळाचे साहित्य लोखंडी कट कपाट ओवरहेड प्रोजेक्टर आरो प्लांट खरेदी करणे इत्यादी ई-निविदा संगनमताने मंजूर केलेल्या आहेत 14 वा वित्त आयोग योजनेतील प्राप्त निधीचा आर्थिक व्यवहार केलेला आहे अशी तक्रार दिलेली होती. जिल्हा परिषद यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून ग्रामसेवक सरपंच यांच्यावर ठपका ठेवून अनियमितता झालेली साडेचार लाखांच्या आसपास रक्कम ग्रामपंचायत खात्यात भरलेली होती ग्रामसेवक यांची बदली झालेली होती सरपंच यांच्यावर कार्यवाही होण्याकरता प्रदीप झेंडे आणि नितीन निगडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती विभागीय आयुक्त यांनी सरपंच बाजीराव काटकर यांचे पदावरून काढून टाकण्यात आले असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेला होता जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती माळशिरस यांना आदेश प्राप्त झालेला आहे माळशिरस तालुक्यात सरपंचावर झालेल्या कार्यवाही मुळे माळशिरस तालुक्यात सरपंचांच्या गोटात खळबळ उडालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng