आदिनाथ साखर कारखान्याची निवडणुकीची मतदार यादी पूर्ण करण्याचे निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

करमाळा (बारामती झटका)

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी १३ मार्च पूर्वी पूर्ण करावी, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त पांडुरंग खंडागळे यांनी दिले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तात्काळ घ्या, या मागणीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी निवडणूक प्राधिकरणाला दिले होते. यावर जावक क्र. १७९९ प्रमाणे तात्काळ सभासद याद्या तयार करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

करमाळा तालुक्यातील सहकार्याची मंदिर व राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे आदिनाथ सहकारी साखर कारखान्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. करमाळ्याच्या राजकारणात आदिनाथ कारखान्याला विशेष महत्त्व असून या कारखान्याचे जवळपास ३५ हजार सभासद असून लोकशाही मार्गाने चालणारा करमाळा तालुक्यातला हा एकमेव कारखाना आहे. हा आजिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी बारामती ॲग्रोचे आमदार रोहित पवार यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी या कारखान्यात लक्ष घालून बारामतीकरांचा डाव उलटून लावला.

हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी व सहकाराच्या मालकीचा राहण्यासाठी प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी स्वतःची बारा कोटी रुपये रक्कम आदिनाथ कारखान्याला दिली.
या आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात तालुक्यातील बागल गट व नारायण पाटील गट दोघेही प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचे नेतृत्व मानतात. शिवाय प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी सातत्याने करमाळा तालुक्यात जनसंपर्क ठेवून स्वतःची एक वेगळी ताकद निर्माण केली आहे.

आमदार संजयमामा शिंदे हे आमदार रोहित पवार व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मदत घेऊन हा आदिनाथ कारखाना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीवरच करमाळा तालुक्यातल्या भावी विधानसभेच्या राजकारणाची गणिते मांडली जाणार आहेत. सहकारी संस्थांची ठराव घेण्याची मुदत १० मार्चला संपली असून आता सभासदांची फायनल यादी १३ मार्चला करण्याचे आदेश असतानासुद्धा अजूनही सहकार खात्याकडे आदिनाथची मूळ सभासदांची यादी पोच झालेली नसल्याची माहिती आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी – तालुकाध्यक्ष कमलाकर दावणे
Next articleसोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी लक्ष घालण्याची गरज…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here