आनंदाची बातमी : गोरडवाडी गावाला १ कोटी ५१ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया सुरू…

तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामुळे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली – विष्णूभाऊ गोरड.

गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडीकरांसाठी आनंदाची बातमी आहे, गेली अनेक वर्ष गोरडवाडीतील जनता आतुरतेने योजनेची वाट पहात होती. गावासाठी पाणीपुरवठा योजना मिळावी अशी गोरडवाडीकरांची अपेक्षा होती. युतीच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अथक परिश्रमाने पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजनेसाठी गोरडवाडीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड, भिकाजीभाऊ गोरड, भागवत कर्णवर पाटील, रामचंद्र गोरड, पांडुरंग पिसे, खंडूतात्या कळसुले, हनुमंत गोरड यांनी पाठपुरावा केलेला असल्याने सदरची योजना मंजूर झाली असल्याची माहिती गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांनी दिली आहे. यावेळी उपस्थित राजेवाडी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माजी सरपंच नानासाहेब हुलगे, विद्यमान सरपंच विजय गोरड, उपसरपंच ताईबाई यमगर, ग्रामपंचायत सदस्य मुगाबाई गोरड, बायडाबाई गोरड, मैनाबाई गोरड, पुनम गोरड, जयश्री कोकरे, मेघा राणी कर्णवर, ज्योती केंगार, ग्रामअधिकारी रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या माध्यमातून गोरडवाडी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना रक्कम रुपये १ कोटी ८४ लाख ८४ हजार ४६ रुपयाची मंजूर झालेली आहे. सदर पाणीपुरवठा योजनेचे टेंडर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत टेंडर प्रक्रिया सुरू आहे.

गोरडवाडी गावाला गेले अनेक वर्ष पाण्याची टंचाई होती, यासाठी गोरडवाडीकर नेहमी त्रस्त असतात. सदाभाऊ खोत यांचा माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील जनतेशी थेट संबंध आलेला होता. लोकसभेचा निसटता पराभव झाल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर संधी देऊन युती सरकारच्या काळामध्ये पाणीपुरवठा राज्यमंत्री केलेले होते. गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड व युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड आणि सदाभाऊ खोत यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गावांमधील अडचण सदाभाऊंच्या कानी घालून सदरची योजना मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असा आग्रह विष्णू भाऊ यांनी धरलेला होता. सदाभाऊ यांनी सदरची योजना मंजूर करून गोरडवाडीकरांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटविलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धगधगता प्रवास…
Next articleकै. शुभदा देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here