आनंदाची बातमी : जांभुड गावाला १ कोटी ४८ लाख ९० हजार ५०० रूपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन अंदाज पत्रक तयार, लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण

तत्कालीन पालकमंत्री दत्तामामा भरणे, पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या अथक प्रयत्नामुळे पाणीपुरवठा योजना मंजूर – युवानेते राहुल खटके पाटील

जांभुड ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील मात्र माढा विधानसभा मतदार संघातील जांभुडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेली अनेक वर्ष जांभुड गावातील जनता आतुरतेने योजनेची वाट पहात होती. गावासाठी पाणीपुरवठा योजना मिळावी अशी गावातील व वाड्या वस्त्यावरील नागरीकांची अपेक्षा होती.

महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे व माढा विधानसभेचे लोकप्रिय पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या अथक परिश्रमाने पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असल्याची माहिती जांभुड विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राष्ट्रवादीचे युवानेते राहुल खटके पाटील यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितली.

तत्कालीन पालकमंत्री दत्तामामा भरणे व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या माध्यमातून जांभुड येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना रक्कम रुपये १ कोटी ४८ लाख ९० हजार ५०० रुपयाची मंजूर झालेली आहे.

सदर पाणीपुरवठा योजनेचे अंदाज पत्रक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत झाले आहे. टेंडर प्रक्रिया सुरू होऊन लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे.

जांभुड गावाला गेली अनेक वर्ष पाण्याची टंचाई होती, यासाठी जांभुडकर नेहमी त्रस्त होते. गावामधील अडचण बबनदादांच्या कानी घालून सदरची योजना मंजूर करण्यासाठी पालकमंत्री यांनी विशेष प्रयत्न करून गावातील व वाड्या वस्त्यावरील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटविलेला असल्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल खटके पाटील यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजावयाने सासऱ्याच्या घरावर डल्ला मारून लाखो रुपयांचे दागिने केले लंपास…
Next articleउड्डाणपूल प्लेट ऐवजी कॉलम मध्ये करावा, सदाशिवनगर पुरंदावडे गावातील व्यापारी व जनतेची मागणी योग्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here