आमदार बबनदादा शिंदे यांचे महाळुंगचे ग्रामदैवत यमाई देवीच्या दर्शनासाठी आगमन.

माढा विधानसभेचे लोकप्रिय पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचे महाळुंग ग्रामस्थांच्यावतीने जंगी स्वागत.

महाळुंग ( बारामती झटका )

माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय व पाणीदार आमदार बबनदादा शिंदे हे महाळुंग गावचे ग्रामदैवत यमाई देवीच्या दर्शनासाठी आले असता महाळुंग ग्रामस्थांनी हलगीच्या निनादामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आदिमाया शक्तीचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने 7 ऑक्टोंबरपासून घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सर्व मंदिरे खुली केलेली आहेत. माळशिरस तालुक्यातील चौदा गावे माढा विधानसभा मतदारसंघात येत असल्याने मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे ग्रामदैवत यमाई देवीचे दर्शनासाठी आलेले होते. ग्रामस्थांनी वाजत गाजत यमाईदेवीच्या दर्शनासाठी आमदारांना मंदिरामध्ये नेले होते. यमाई देवस्थानच्यावतीने पुजारी यांनी आमदार बबनदादा यांचा सन्मान यमाई देवीच्या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये करण्यात आला.


माळशिरस तालुक्यातील 14 गावांच्यावतीने पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचा सन्मान सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व महाळुंग गावचे युवा नेते राहुल रेडे पाटील यांनी केला. यावेळी जेष्ठ नेते रावसाहेब सावंत पाटील, मौलाचाचा पठाण, चेअरमन दादासाहेब लाटे, मारुतीराव रेडे पाटील, विक्रमसिंह लाटे, शरद प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत मुंडफणे पाटील, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक सोलापूर जिल्हा वजीरभाई डांगे, वि.वि.सो. चेअरमन, भिमराव रेडे पाटील, लखन धुमाळ, ता.उपाध्यक्ष राष्ट्रवादी, युवा कार्यकर्ते राज आठवले, विपिन वगरे, संजय घोंगाणे यमाई प्रतिष्ठान अध्यक्ष, विनोद इंदलकर, गुलशन मंडले, संदीप सावंत पाटील, दिनेश यादव, नितिन रेडे पाटील, अनिकेत यादव, अमोल कदम, तुषार मुंडफणे, गौरव लोखंडे, महादेव भोसले, अविनाश भोसले, संजय यादव, जेष्ठ मंडळी नामदेव मुडफणे, विष्णू जाधव, मधुकर शिंदे, विष्णू चव्हाण, राजू चव्हाण,हसोमा माने, बुवा रेडे पाटील, माऊली हाके श्रावण भोसले आदी उपस्थित होते.


आमदार बबनदादा शिंदे यांनी पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांना यमाई देवीच्या मंदिर बारव, तटभिंत व इतर दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयाची मागणी केलेली होती. पुरातत्व खात्याचे अधिकारी यांनी मंदिराची पाहणी करून गेले होते, याविषयी चर्चा झाली. तसेच मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवटपळी, कोंडबावी येथील श्रीमती कलावती शंकर घुले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
Next articleभटक्या विमुक्त जाती जमाती च्या अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती मधील आरक्षण कायम मिळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here