आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य पदी निवड

माळशिरस ( बारामती झटका)

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनियुक्ती केली आहे.

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासारखा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू आमदाराची पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांच्या अनुभवाचा व अभ्यासाचा फायदा विद्यापीठाला नक्कीच होईल म्हणून शिक्षण क्षेत्रील जाणकार व तज्ञ मंडळी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दि. १३ मे २०२६ पर्यंत मोहिते पाटील यांच्या विद्यापीठ अधिसभा सदस्यत्वांची मुदत असणार आहे.

शिवरत्न शिक्षण संस्था, शिव-पार्वती सार्वजनिक ट्रस्ट, शिक्षण प्रसारक मंडळ या सारख्या नामवंत व दर्जेदार उच्च शिक्षण देणाऱ्या सोलापूर व पुणे जिल्ह्यात शिक्षण संस्था मोहिते पाटील यांच्या असून त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आमदार म्हणून देशातील नामवंत असे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleयुवकांनी युवा मोर्चाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविले पाहिजे…
Next articleमाळशिरस येथे मंगळवारी दि. १० मे रोजी रिपाइंचे वतीने आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here