आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते गोरडवाडीचे बिनविरोध सरपंच विजय गोरड यांचा सन्मान.

गोरडवाडी गावच्या चौफेर विकासासाठी सहकार्य करू – विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील.

माळशिरस ( बारामती झटका )

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते गोरडवाडीचे बिनविरोध नूतन सरपंच विजय गोरड यांचा सदाशिवनगर येथील कारखान्याच्या गेस्ट हाउसमध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, आजिनाथ कर्णवर, युवा नेते कांतीलाल लवटे, रामराव गोरड, सोमनाथ कोकरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकारणामध्ये पश्चिम भागात माजी उपसभापती स्वर्गीय माणिकराव कर्णवर पाटील यांच्यासोबत गोरडवाडीचे पहिले बिनविरोध सरपंच निवृत्तीदादा गोरड, ज्येष्ठ नेते व तंटामुक्तीचे अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब कर्णवर अशा अनेक मंडळींनी सहकार महर्षी व विजयदादा यांना साथ दिलेली आहे. तिसऱ्या पीडित सुद्धा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, यांनासुद्धा गोरडवाडीतील मोहिते पाटील समर्थक यांची मोलाची साथ मिळत आहे.

कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची खास उपस्थिती असते. गोरडवाडीचे बिनविरोध नूतन सरपंच विजय गोरड यांचा सन्मान करून भविष्यामध्ये गोरडवाडीच्या चौफेर विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सत्काराच्या प्रसंगी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleया शिबीरामुळे माझी ३५० शुगर आता ११० अशी नॉर्मल झाली
Next articleअंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा तीन वर्षांनी भरणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here