आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी स्वीकारले सदाशिवनगर व पुरंदावडे गावचे पालकतत्व

सदाशिवनगर (बारामती झटका)

सध्या सदाशिवनगर व पुरंदवडे गावामध्ये उड्डाण पुलावरून राजकीय घडामोडी चालू आहेत. सदाशिवनगर या ठिकाणी होत असलेल्या प्लेटच्या उड्डाणपुलाला सर्व ग्रामस्थांचा याला विरोध असून प्लेटऐवजी कॉलमचा उड्डाणपूल व्हावा, यासाठी सर्वांची मागणी आहे. त्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दि. 26/07/2022 रोजी रास्ता रोको मोर्चा व गाव बंद ठेवून आंदोलन केले होते.

परंतु, त्यानंतरही उड्डाणपुलाचे काम चालूच राहिले होते. त्यासाठी दि. 03/08/2022 रोजी पुन्हा सदाशिवनगर व पुरंदावडे गाव बंद ठेवून त्याचा निषेध केला होता. व दि. 05/08/2022 पासून उपोषण चालू करणार होते. परंतु, विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी यामध्ये मध्यस्थी घेऊन आज दि. 05/08/2022 रोजी सकाळी शिवरत्न बंगल्यावर उड्डाणपुला संदर्भात मीटिंग आयोजित केली होती. यामध्ये दोन्ही गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यावर लवकरच केंद्रीय मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. व तोपर्यंत उड्डाणपुलाच्या कामासाठी स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उड्डाणपूल संघर्ष समितीने जो उपोषणाचा निर्णय घेतला होता, तो सध्या काही दिवस पुढे ढकलण्यात आलेला आहे, असे उड्डाणपूल संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. पोपट गरगडे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleहौसेनं केला पती, तो निघाला रोगपती… अशी अवस्था नातेपुते नगरपंचायतीच्या विकासकामांची झाली…
Next articleराज्य निवडणूक आयोगाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here