आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून मातंग समाजास सभामंडप मंजूर – आबासाहेब भिसे.

अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाला दिलेला शब्द आमदारांनी खरा केला, शब्दाला पक्के असणारे आमदार राम सातपुते यांच्याविषयी मातंग समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस येथील मातंग समाजाची सभामंडपाची अनेक दिवसाची असणारी अडचण भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मातंग समाजाच्या सभामंडपास विशेष प्रयत्न केल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 20 21 22 या वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातील मंजूर करण्यात आलेल्या कामामध्ये मातंग वस्ती येथे सात लाख रुपये सभामंडपासाठी मंजूर झाले असल्याचे युवा नेते आबासाहेब भिसे यांनी माहिती दिली.
मेडद येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास लोकप्रिय आमदार राम सातपुते यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित केले होते. त्यावेळेस लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी मातंग समाजाची अडचण लक्षात घेऊन सभामंडप मंजूर करू, असा शब्द सर्व मातंग बांधवांना दिलेला होता. आमदार राम सातपुते यांनी दिलेला शब्द खरा केलेला आहे, त्यामुळे आमदार राम सातपुते दिलेल्या शब्दाचे पक्के आमदार, अशी भावना मातंग समाजामध्ये झाली असल्याचे सांगून मातंग समाजामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, असे आबासाहेब भिसे यांनी सांगितले.
सभामंडप मंजूर झाल्यानंतर गावामध्ये बक्षीस पत्र व इतर अडचणी दूर करण्याकरता माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, उपसरपंच शिवाजीभाऊ लवटे, शंकर काळे, माजी सरपंच सचिन लवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेवराव काळे, भास्कर तुपे, विजय तुपे, हरी जगताप, भगवान झंजे आदी मान्यवरांचे सहकार्य लागणार आहे.


मेडद गावामध्ये मातंग समाजाची अडीचशे लोकसंख्या आहे. अनेक दिवसाची मातंग समाजाची मागणी होती कि, सभामंडप असावे. मातंग समाजाची मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या अथक प्रयत्नातून पूर्ण झालेले असल्याने लवकरच आमदार राम सातपुते यांचा मातंग समाजाच्यावतीने भव्य सन्मान सोहळा आयोजित करणार असल्याचे युवा नेते आबासाहेब भिसे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदवावा – नगराध्यक्षा अंकिता शहा
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रियांका धनाजी टेळे यांची प्रचारात आघाडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here