आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीसांचा विश्वास ठरवला सार्थ.

प्रभारी म्हापसा विधानसभेवर फडकवला भाजपाचा झेंडा.

भाजपा उमेदवार जोशुआ डिसुझा झाले विजयी

माळशिरस ( बारामती झटका )

देशभरातील पाच विधानसभेतील निवडणूक पार पडली. महाराष्ट्रात भाजपाचे लक्ष मात्र गोवा विधानसभा निवडणुकीवर बारीक लक्ष होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा विधानसभेचे प्रभारी म्हणून जबाबदारी पक्षाने दिली. निवडणुकीच्या 3 महिने अगोदरपासून फडणवीसांनी पूर्ण ताकत लावून निवडणूक जिंकायचा संकल्प केला आणि त्यात ते यशस्वी सुद्धा ठरले.

देवेंद्र फडणविसांनी आपल्या विश्वासू 40 शिलेदारांना एक एक मतदारसंघ दिला. माळशिरसचे युवा आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे म्हापसा विधानसभेची प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जवाबदारी दिली. म्हापसा विधानसभा तसा भाजपाचा परंपरागत मतदारसंघ. पण यावेळी मात्र या मतदारसंघात पूर्ण ताकत लावावी लागेल अशी स्थिती होती.

आमदार राम सातपुते हे निवडणुकीसाठी 45 दिवस म्हापसा मतदारसंघात ठाण मांडून बसले आणि यश खेचून आणले.
भाजपा उमेदवार जोशुआ डिसूजा यांच्या विजयात आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पूर्ण कस लावून प्रचार यंत्रणा राबवली.

म्हापसा मतदारसंघ तसा हिंदू बहुल पण भाजपाने मागच्या 20 वर्षांपासून ख्रिश्चन आमदार निवडून आणला आहे.
तालुक्यातील 50 कार्यकर्त्यांची फौज आमदार राम सातपुते यांनी म्हापसामध्ये घेऊन जाऊन विजयश्री खेचून आणली आहे.
माळशिरस तालुक्यात सध्या एकच चर्चा आहे, आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीसांचा विश्वास सार्थ ठरवला. या विजयाबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आमदार राम सातपुते यांचे फोनवरून अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतहसीलदार जगदीश निंबाळकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांची धाव.
Next articleजनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here