कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार यांच्या पाठपुराव्याला यश.

जामखेड-सौताडा १५८ कोटींच्या महामार्गास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची आर्थिक तरतूदीस मान्यता

जामखेड (बारामती झटका)

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार हे मतदार संघातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांनी अनेक विषय मार्गी देखील लावली आहेत. त्यातच आता जामखेड-सौताडा या महामार्गाला आमदार रोहितदादा पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या स्थायी आर्थिक समितीची आर्थिक तरतूदीस मान्यता मिळाली आहे आणि त्याची किंमत एकूण १५७ कोटी रुपये आहे.

जामखेड-सौताडा हा महामार्ग पुढे पाटोदा आणि बीडला जोडला गेलेला आहे. या महामार्गाच्या आर्थिक तरतुदीस स्थायी आर्थिक समितीची मान्यता मिळाल्याने निविदा निघून आता हे काम लवकरच मार्गी लागेल आणि रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता होणार आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सोबतच राज्य व इतर रस्त्यांसाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी अनेक वेळा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेत गडकरींनी निधी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड हा प्रमुख महामार्ग आहे. या महामार्गापैकी श्रीगोंदा ते जामखेड या टप्प्याला गडकरी यांनी यापूर्वीच निधी दिला असून नगरमध्ये खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या महामार्गांच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी या महामार्गावरील जामखेड ते सौताडा या पुढील टप्प्यासाठी ही नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली होती. त्यासाठी निधीची तरतूद करण्याची विनंतीही आमदार रोहितदादा पवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेली होती.

आता त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असताना पाहायला मिळत आहे. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देखील या विषयांमध्ये विशेष लक्ष घातलं होतं. त्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांनी वेळोवेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिल्लीत जाऊन देखील पाठपुरावा केला होता. आमदार रोहितदादा पवार यांनी केलेल्या प्रयत्नातून अखेर आता जामखेड सौताडा या महामार्गाच्या आर्थिक तरतुदीस मान्यता मिळाल्याने हा महामार्ग अखेर मार्गी लागणार आहे. या व अशा विविध कामांसाठी आमदार रोहितदादा पवार हे सतत झटत असतात. तसेच ते वैयक्तिकरीत्या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन असतात. त्यामुळेच मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लागत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article१२५ वर्षांचे स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य…
Next articleआरपीआयचे नूतन जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचा जाहीर सत्कार संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here