माळशिरस ( बारामती झटका )
कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 3/11/2021 रोजी सकाळी दहा वाजता माळशिरस पोलीस स्टेशन जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
सदर मेळावा कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सदर मेळाव्याच्या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक धनंजय साठे, माळशिरस तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, माळशिरस तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा ऋतुजाताई मोरे, माळशिरस तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा कीर्ती पालवे, माळशिरस तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष सोमनाथ पिसे, माळशिरस तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत काळे आदी मान्यवरांच्या समवेत अनेक सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकारामभाऊ देशमुख, आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे यांनी आवाहन करीत मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे कोरोना चे नियम पाळण्याचे बंधनकारक असल्याचे सांगितलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng